क्रिडाताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराष्ट्रिय

पिंपरी-चिंचवड: चंद्रकांत साठे यांच्या स्मरणार्थ रंगणार टी-ट्‌वेंटी क्रिकेट स्पर्धा

पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजन

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने चंद्रकांत साठे यांच्या स्मरणार्थ टी-20 खुल्या गटाच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड मधील खेळाडूंसाठी क्रीडा नैपुण्य दाखवण्याची संधी मिळावी, या उद्देशातून 17 ते 27 ऑक्‍टोबर 2023 च्या दरम्यान या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड पिंपरी-चिंचवड प्रीमियर लीगसाठी करण्यात येईल, अशी माहिती आयोजक जगदीश शेट्टी यांनी निगडी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी असोसिएशनचे सचिव राजू कोतवाल, खजिनदार संजय शिंदे, नरेंद्र कदम, प्रदीप वाघ, मनोज कदम, डॉ. मृदुला महाजन उपस्थित होत्या.

14 व 17 वर्षाखालील गटांकरिता क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धा सिल्वर क्रिकेट मैदान चिखली आणि परंदवाल क्रिकेट मैदान, देहू येथे होणार आहे. ही स्पर्धा गुलाबी चेंडूवर व बाद पद्धतीने खेळली जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 32 संघाचा समावेश असून प्रत्येक संघामध्ये 15 खेळाडू असणार आहेत. या स्पर्धेत प्रथम क्रमांकास 25 हजार व चषक, द्वितीय क्रमांकास 21 हजार व चषक, तृतीय क्रमांकास 10 हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. प्रत्येक सामन्यात सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक व उत्कृष्ट यष्टिरक्षक अशी बक्षिसेही ठेवण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button