breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपरी-चिंचवड भाजपामधील ‘आउटगोईंग’ लांबणीवर; राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ‘ॲक्शन मोड’वर!

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा अद्याप भ्रमनिरास
  • आरक्षण सोडत, ओबीसी आरक्षण निर्णयाची नाराजांना प्रतीक्षा

पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपामधील नाराज नगरसेवकांचा भलामोठा गट राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे, अशी चर्चा आहे. राष्ट्रवादीचे ‘कारभारी’ अजित पवार यांनी नाराजांना चुचकारण्याचा प्रयत्न केला, असाही दावा केला जात आहे. परंतु, आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘ॲक्शन मोड’ वर आल्यामुळे कथित नाराजांची बंडखोरी आणखी लांबणीवर पडली आहे. परिणामी, भाजपामधील बंडखोरीवर नजरा लावून बसलेल्या राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा भ्रमनिरास झाला असून, ओबीसी आरक्षण निर्णय आणि आरक्षण सोडत होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

महापालिकेत तब्बल २० वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला २०१७ मध्ये पायउतार व्हावे लागले. त्यावेळी मोदी आणि भाजपाची लाट असल्यामुळे अनेकांनी भारतीय जनता पार्टीच्या जहाजात उड्या मारल्या. आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अनेकांची राजकीय महत्त्वाकांक्षा जागृत झाली. त्यामुळे भाजपामध्ये बंडखोरीचे पउघम वाजू लागले.

महाविकास आघाडी सरकारची स्थापना होवून आता अडीच वर्षांचा काळ लोटला आहे. गेल्या वर्षभरापासून पिंपरी-चिंचवडमधील भाजपातील नाराजीचा मुद्दा समोर आला. आगामी महापालिका निवडणुकीतील संभाव्य धोका ओळखून भाजपाचे प्रदेश सहसचिव श्रीकांत भारतीय यांच्याकडे पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष घालण्याची जबाबदारी सोपवली होती. त्यानुसार, भारतीय यांनी संबंधित नाराज नगरसेवक आणि त्यांच्या असण्याने किंवा नसण्याने पक्षात काय परिणाम होईल? या अभ्यास केला. त्यानुसार आवश्यकता भासेल तिथे प्रत्यक्ष बोलून आणि बैठक घेवून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. आता थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीच ‘एसएमएस’ करुन नाराजांची मोट बांधण्याची भूमिका घेतली. त्यामुळे एकाही नाराज नगरसेवकाने अद्याप पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला नाही.

संभाव्य बंडखोरी  थांबण्याची ही आहेत कारणे?

  • सहा महिन्यांपासूनच भाजपा प्रदेश सचिव श्रीकांत भारतीय यांनी पिंपरी-चिंचवडमधील नाराजांच्या संपर्कात आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून भारतीय यांची ओळख आहे.
  • भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी १० मार्च रोजी राज्यात राजकीय भूकंप होईल, असे भाकीत केले आहे. देशातील पाच राज्यांतील निवडणुकांचा निकाल असल्यामुळे अनेकांनी ‘वेट ॲड वॉच’ची भूमिका ठेवली आहे.
  • सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
  • प्रारुप प्रभाग रचनेत शहरातील अनेकांची कोंडी केल्यामुळे हरकती आणि सूचनांचा मोठ्याप्रमाणात आहेत. त्यामुळे प्रभाग रचनेत बदल होण्याची शक्यता आहे.
  • महाविकास आघाडीतील ‘दुवा’ अशी ओळख असलेले शिवसेना खासदार यांच्यामागे ईडी आणि चौकशीचा सुरू असलेला ससेमिरा.
  • महापालिका सार्वत्रिक निवडणुका कधी होणार? याबाबत असलेली अनिश्चितता.

आमदार बंधू ‘कार्तिक-शंकर’ जोडी मैदानात … 

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रारुप प्रभाग रचनेची प्रसिद्धी होताच भाजपाचे दोन्ही आमदार अर्थात शहराध्यक्ष महेश लांडगे आणि माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचे बंधू कार्तिक लांडगे आणि शंकर जगताप झपाटून कामाला लागले आहेत. अत्यंत प्रोफेशनल असलेल्या या दोन्ही व्यक्तींनी आपल्या मोठ्या भावाच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेची असलेली ही निवडणूक जिंकण्यासाठी भोसरी, चिंचवड आणि पिंपरीत बारिक लक्ष घातले आहे. प्रत्येक प्रभागातील संभाव्य बंडखोरी लक्षात घेत त्या-त्या ठिकाणी तुल्यबळ उमेदवारांना ताकद देण्याची भूमिका ठेवली आहे. त्यामुळे नाराजांची एकत्रित मोट बांधून भाजपाला खिंडार पाडण्याची महत्त्वाकांक्षा काहींना होती. मात्र, भाजपाच्या स्थानिक आणि प्रदेशातील नेतृत्त्वाने ‘युनिटी’ने परिस्थिती नियंत्रणा ठेवली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या नेत्यांनी अनेकदा भाजपातील नाराजांना सोबत घेवून सत्तास्थापनेची ‘डरकाळी’ फोडली. पण, अद्याप त्याला यश येताना दिसत नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button