breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचे आंदोलन प्रभावी; पण, आमदार अण्णा बनसोडे यांची अनुपस्थिती!

पिंपरी ।  प्रतिनिधी

महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने बुधवारी महापालिकेवर निषेध मोर्चा काढला. पक्षाचे १५-१६ आजी-माजी नगरसेवक सर्व सेल प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते महापालिका भवन असा मोर्चा काढत धुरळा उडवून दिला. शेकडो कार्यकर्ते सहभागी झाल्यामुळे राष्ट्रवादी कधी नव्हे ती इतकी आक्रमक पहायला मिळाली. मात्र, या आंदोलनाला शहरातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार अण्णा बनसोडे यांची अनुपस्थिती होती. बनसोडे यांनी आंदोलनाला दांडी का मारली? अशी चर्चा आता जोर धरु लागली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीतील आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझम पानसरे ही दिग्गज मंडळी ज्येष्ठ आणि अनुभवी आहेत. पानसरे यांना प्रकृतीच्या कारणास्तव आंदोलन, बैठकांना उपस्थित राहता येत नाही. पण, बनसोडे ‘सिंटींग’ आमदार आहेत.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिका भवन आणि बुधवारी आंदोलन झाले तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकही पिंपरी विधानसभा मतदार संघामध्ये येतो. आपल्याच मतदार संघात आणि शहरातील महत्त्वाच्या विषयावर आंदोलन असताही आमदार बनसोडे यांनी दांडी मारणे अपेक्षित नव्हते.

…तर आंदोलन आणखी प्रभावी झाले असते!

सत्ताधारी भाजपा विरोधात आवाज उठवण्यासाठी स्थानिक पदाधिकारी कमी पडत आहेत, असा सूर कायम दिसतो. मात्र, बुधवारच्या आंदोलन आणि मोर्चामध्ये राष्ट्रवादी आक्रमक होताना दिसले. आजी-माजी नगरसेवकांनी आंदोलनला हजेरी लावली. पूर्वी आंदोलनाला ३६ पैकी २-४ नगरसेवक दिसत होते. आजचा आकडा १५-१६ पर्यंत गेलेला दिसला. नंदीबैल, पोतराज, गोंधळी, वासुदेव… आदींचा समावेश करीत राष्ट्रवादीने आंदोलनाला अपेक्षेप्रमाणे ‘इव्हेंट’ चे रुप दिले. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेते-पदाधिकाऱ्यांनी वज्रमूठ बांधली. त्यात आमदार अण्णा बनसोडे उपस्थित असते, तर चार चाँद लागले असते..! अशी भावना राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांकडून व्यक्त होते आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button