breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्वच्छ सर्वेक्षणात पालिका पिछाडीवर; जबाबदार अधिकारी, पदाधिका-यांचा निषेध 

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्वच्छतेबाबत केवळ तीन वर्षांत शहराची अवस्था इतकी वाईट झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानांतर्गत ४ ते ३१ जानेवारी दरम्यान सर्वेक्षण झाले. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण यादी (दि. ६) जाहिर झाली. त्यामध्ये यंदा शहराची घसरण झाली आहे. याला जबाबदार अधिकारी आणि सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांचा माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी तिव्र निषेध केला आहे.

  • ४ ते ३१ जानेवारी दरम्यान, स्वच्छ  सर्वेक्षण अभियान राबविण्यात आले. व्यापक स्वरुपात नागरिकांचा व समाजातील सर्व स्तरांचा सहभाग स्वच्छ भारत अभियानामध्ये घेणे व याकरिता त्यांच्यामध्ये माहिती, शिक्षण व संवादाद्वारे साधून त्यांच्या वर्तनातील बदल घडविणे, या सर्वेक्षणाचा प्रमुख हेतु होता. त्यासाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. या कामासाठी मनपाने अठरा लाख रुपये खर्च केला. परंतु, ही जनजागृती अंमलात येताना दिसली नाही. अठरा लाख रुपयांचा चुराडा करुन केवळ कागदी घोडे नाचवुन हे बोगस काम करण्यात आले आहे. २०१६ मध्ये स्वच्छ भारत अभियानात आपले शहर ‘टॉप टेन’ मध्ये होते. देशात ९ व्या क्रमांकावरील महापालिका महाराष्ट्रात अव्वलस्थानी होती. भाजपाच्या राजवटीत २०१७ मध्ये शहर पिछाडीवर गेले. ९ व्या क्रमांकावरील आपले शहर थेट ७२ व्या स्थानी फेकले गेले. गतवर्षी त्यामध्ये किंचतशी सुधारणा झाली. देशात महापालिकेचा ४३ वा, तर राज्यात ६ वा क्रमांक आला. मात्र यंदा देशात ५२, तर राज्यात १३ वा क्रमांक आला आहे.

मागील दोन वर्षात  महापालिकेतील पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवक, ठेकेदार, सल्लागार, संगनमत करुन (रिंग) करदात्या नागरिकांच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या दरोडे घालून आपले खिसे भरण्यामध्ये मदमस्त आहेत. मागील दोन आर्थिक वर्षात स्थायी समितीच्या कारभारला अक्षरशः मासळी बाजाराचे स्वरुप आले आहे. कचरा निविदेतील संगणमत व टक्केवारीमुळे शहरवासीयांची कचराकोंडी करुन त्यांच्या जिवीताशी खेळण्याचा गंभीर गुन्हा सत्ताधारी पदाधिका-यांनी केला आहे. या प्रकरणात कायदेशीर कर्तव्य बजावण्यास आपण निष्क्रिय ठरला आहात, याचा पुरावा आहे, असा आरोप भापकर यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्यावर केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button