breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘Pimpri Chinchwad’: दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ‘रुट मार्च’

पिंपरी-चिंचवड | महाईन्यूज |

दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून शहरात शांतता अबाधित राखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत कोंबिंग ऑपरेशन, प्रतिबंधात्मक कारवाई करून शुक्रवारी शहरात ‘रुट मार्च’ काढण्यात आला.

सीएए, एनआरसी व एनपीआर या कायद्यांच्या समर्थनार्थ व विरोधात देशभर आंदोलन करण्यात येत आहेत. दिल्ली येथील या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यात काही जणांचा बळी गेला. त्यामुळे या हिंसाचाराचे व्हिडीओ तसेच प्रक्षोभक ‘पोस्ट’ सोशल मीडियावरून व्हायरल व फॉरवर्ड केल्या जात आहेत. त्यामुळे शहरातील शांततेस बाधा निर्माण होऊ शकते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी शांतता राखण्याचे पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे. तसेच खबरदारीच्या उपाययोजनाही केल्या जात आहेत.

पिंपरी पोलिसांकडून गुुरवारी म्हणजेच दि. २७ला कोंबिंग ऑपरेशन दरम्यान गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. तसेच गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई देखील केली. परिमंडळ एकच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, खराळवाडी, पिंपरी कॅम्प, भाटनगर, मिलिंद नगर, दापोडी आदी ठिकाणी पोलिसांचा ‘रुट मार्च’ झाला. कोंबिंग ऑपरेशन सोबतच पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा केली. यात पोलिसांनी नऊ आरोपींवर कारवाई करण्यात आली… तसेच कासारवाडी व दापोडी परिसरात ‘रुट मार्च’ काढण्यात आला.
 

दरम्यान सोशल मीडियावरून अफवा पसरवली जाण्याची शक्यता असल्यानं शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गर्दी तसेच महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एवढच नाही तर, संवेदनशील भागातील पोलीस बंदोबस्तात वाढही करण्यात आली आहे.
तसेच अफवांवर विश्वास न ठेवता शहरातील नागरिकांनी शांतता राखावी, कायद्याचे पालन करावे. संशयास्पद काही आढळल्यास पोलिसांशी त्वरित संपर्क साधावा असं आवाहन पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी केलं आहे…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button