breaking-newsताज्या घडामोडीमुंबईव्यापार

GOOD NEWS : ऐन लग्नसराईत सोन्याच्या किंमती कमी होण्याची शक्यता!

मुंबई । महाईन्यूज । ऑनलाईन टीम

आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमती कमी झाल्याने देशातील सोन्याच्या किंमतींवर त्यांचा परिणाम झाला आहे. येणाऱ्या काळात सोन्याच्या किंमती आणखी घसरु शकतात, अशी शक्यता HDFC सिक्युरिटीजचे समीक्षक तपन पटेल यांनी दिली आहे.

चीनमधील जीवघेण्या कोरोना विषाणूचा परिणाम सोन्याच्या किंमतींवर झालेला पाहायला मिळत आहे. मागणी कमी झाल्याने शुक्रवारी सोन्याचे भाव घसरले. त्यामुळे दिल्लीच्या सराफा बाजारात 10 ग्राम सोन्याच्या किंमतीत 222 रुपयांची घसरण झाली आहे.

चांदीचेही भाव उतरले

सोन्यासोबतच चांदीच्या किमतीही घसरल्या आहेत. एक किलो चांदी 60 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

शुक्रवारी सोन्याचा भाव

दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी 99.9 टक्के शुद्ध सोन्याची किंमत आता 43,580 रुपयांवरुन 43,358 रुपये प्रती दहा ग्रामवर आलं.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर

त्याशिवाय, बुधवारी सोन्याचा भाव हा 43,502 रुपये प्रती दहा ग्राम होता. तर, मंगळवारी सोन्याचा भाव 43,564 रुपये प्रती दहा ग्राम होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,632 डॉलर प्रती औन्स आणि चांदी 17.25 डॉलर प्रती औन्स होता.

गुरुवारी सोन्या-चांदींच्या किंमतीत वाढ

गुरुवारी सोनं आणि चांदीच्या किंमती पुन्हा वाढल्या होत्या. गुरुवारी चांदीची किंमत 35 रुपयांनी वाढून 48,130 रुपयांवर पोहोचली.

पुण्यातील सोन्या-चांदीचे भाव :

सोने : ४० हजार ६०० रुपये. प्रतितोळा

चांदी : ४९ हजार ५७० रुपये प्रतिकिलो

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button