TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

तीर्थक्षेत्र अरण ला ” अ” दर्जा मिळवून देणार-गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

दानशूर व्यक्तींनी या प्रकल्पाला सढळ हाताने भरघोस मदत करण्याचे आवाहन

वाकड : शासकीय व प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून अरण( ता माढा, जि सोलापूर) या तीर्थक्षेत्रास “अ” दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. गृहनिर्माण व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले. समाजातील दानशूर व्यक्तींनी या प्रकल्पाला सढळ हाताने भरघोस मदत करावे असे आवाहन यांनी केले.

महात्मा जोतिबा फुले मंडळ,पिंपरी चिंचवड व संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने वाकड येथील एका हाॅटेल मध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी सावता महाराज यांचे वंशज हभप रविकांत महाराज वसेकर,हभप सावता महाराज वसेकर, हभप साखरचंद महाराज लोखंडे,हभप महादेव महाराज भुजबळ, उद्योजक ध्रुव कानपिळे, जेष्ठ नेते अमृत,शेवकरी, निलेश गिरमे, माजी महापौर डॉ.वैशाली घोडेकर, सामाजिक कार्यकर्त्या वंदना आल्हाट,नवी मुंबई चे उद्धव भुजबळ, महात्मा जोतिबा फुले मंडळाचे अनिल सांळुखे,सुर्यकांत ताम्हाणे,विजय दर्शले, विश्वासराव राऊत, प्रदीप दर्शले,नवनाथ कुदळे,वैजनाथ माळी, गणेश जांभुळकर, निखिल यादव, युवराज लोखंडे,चैतन्य भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.

संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सावता महाराज यांची जन्मभूमी असलेल्या तीर्थक्षेत्र अरण या ठिकाणी तीन एकर क्षेत्रामध्ये भव्यदिव्य भक्तनिवास प्रकल्प साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे अंदाजपत्र अंदाजे ३० कोटी रुपये आहे.
माळी समाजाच्या दृष्टीने महत्वाकांक्षी प्रकल्प साकार करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील विशेष करून पिंपरी चिंचवड व चाकण परिसरातील समाज बांधवांनी आतापर्यंत जवळपास १ कोटींचा निधी उभारला आहे. मोशी,चिखली व वाकड येथील समाज बांधवांचे योगदान लक्षणीय आहे. श्री सावे यांनी २५ लाख रुपये प्राथमिक मदत तर दिलीच पण या कामाला बळ देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. व याचा पाठपुरावा करण्यासाठी मी कटिबद्ध राहिन याची ग्वाही दिली.

श्री. सावे यांनी भक्तनिवासाचा हा प्रकल्प पुर्णत्वास कसा नेता येऊ शकतो, याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना सावे म्हणाले की, “माळी समाजाचे उर्जाकेद्र असलेले तीर्थक्षेत्र अरण शक्तीसंपन्न व प्रेक्षणीय करणं ही आपली प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे, व ते साकारण्यासाठी प्रत्येकाने तळमळीने काम करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी उद्योजक प्रशांत डोके यांनी संपूर्ण प्रकल्पाला सीमा भिंत बांधून देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महात्मा जोतिबा फुले मंडळाचे अध्यक्ष हणमंत माळी यांनी केले तर या प्रकल्पाच्या आतापर्यंतच्या कामाचा संपूर्ण आढावा हभप प्रभू महाराज माळी यांनी उपस्थितांसमोर मांडला. माजी नगरसेवक वंसत लोंढे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button