पिंपरी / चिंचवड

आकुर्डीत पादचारी महिलेची पर्स हिसकावली

पिंपरी l प्रतिनिधी

रस्त्याने पायी चालत जाणा-या महिलेची दोन चोरट्यांनी पर्स हिसकावून नेली. त्यात सहा हजार 300 रुपयांचा ऐवज होता. ही घटना शनिवारी (दि. 23) रात्री साडेआठ वाजता आकुर्डी येथे घडली.

डायना फ्रॅको डिसुजा (वय 39, रा. अशोकनगर, बाळकुंभ, ठाणे पश्चिम) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास फिर्यादी डिसुजा आकुर्डी येथील संभाजी चौक ते सीएसएम स्कूल या रस्त्याने पायी चालत जात होत्या. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून दोन अनोळखी चोरटे आले. त्यांनी फिर्यादी यांच्या हातातील पर्स जबरदस्तीने हिसकावून चोरून नेली.

300 रुपयांच्या पर्समध्ये तीन हजार रुपये रोख रक्कम, तीन हजारांची सोन्याची अंगठी, आयडीएफसी बँकेचे क्रेडीट कार्ड, युनियन बँकेचे डेबिट कार्ड, घराच्या चावीचा बंच असा सहा हजार 300 रुपयांचा ऐवज होता. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button