breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये महाराष्ट्र व कामगार दिन विविध कार्यक्रमाने साजरा

पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनने कामगार दिनानिमित्त अनोखा उपक्रम सुरु करून परिसरात १० ठिकाणी मोफत पाणपोईची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. याप्रसंगी उन्नती सोशल फौंडेशनचे संस्थापक संजय भिसे, अध्यक्षा कुंदा भिसे, ज्येष्ठ नागरिक रवींद्र पाटील, रमेश वाणी, रामप्रकाश वासन, विनोद भल्ला, विलास नगरकर तसेच आनंद हास्य योगा क्लबचे सर्व सभासद, वनवचैतन्य हास्य क्लबचे सभासद व परिसरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, परिसरातील नागरिक उपस्थित होते.

साफसफाई कामगार इस्माईल शेख, दिनेश तुपे,चंदन बोरीकर, सुनील शेळके, शैलेश मगर, गोरख दाभाडे, कृष्णा साळवी, विशाल पवार, आकाश पडवळ, राहुल धन्द्रे,अलका आलटे व विकास सुटेकर यांच्या हस्ते मोफत पाणपोईचे उदघाटन करण्यात आले.

वडार मजूर शिल्प प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त चिंचवड, संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली उद्यानातील वडार मजूर शिल्पाला राज्यमंत्री व मी वडार महाराष्ट्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या वडार समाजातील कर्तृत्ववानांचा लोकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी मी वडार महाराष्ट्र संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश धोत्रे, उपाध्यक्ष संतोष मोहिते, श्याम पवार, शंकर कुराडे, पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर हनुमंतराव भोसले, पांडुरंग लष्करे, नितीन धोत्रे, संजय कुसाळकर, रामभाऊ कुसाळकर, अशोक लष्करे, गणेश पवार, सुनील पवार, हिरामण पवार, संभाजी दौंडकर आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात माजी महापौर हनुमंत भोसले, चाकणच्या महिला सरपंच सुंदराबाई लष्करे यांना समाज गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच वडार समाजातील ज्येष्ठ साहित्यिक टी. एस. चव्हाण, वधू-वर सूचक मंडळ अध्यक्ष अशोक पवार यांचा विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे वडार समाजातील शिल्पकार दिलीप धोत्रे, मरगु पाथरवट, शंकर धोत्रे, संतोष विटकर, लक्ष्मण पाथरवट, कलावती पवार, लिलाबाई धोत्रे यांना शिल्पकार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी नगरसेवक तुषार हिंगे यांनी मार्गदर्शन केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल विटकर, शाम विटकर, राजीव कुसाळकर, अनंत नलावडे, अमर दौंडकर, लखन पाटकर, सागर ओरसे, अमोल पवार, राहुल दौंडकर, नवनाथ कुसाळकर, नागेश पवार, राजेंद्र शिंदे, पिंटू जाधव, लक्ष्मण विटकर यांनी परिश्रम घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button