breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

‘IAS-IPS आणि डॉक्टर झालेल्या मुस्लिम महिलांनी हिजाब घालावा’; मुस्लिम नेत्याचं धक्कादायक विधान

Badruddin Ajmal | मुस्लिम समाजातील IAS-IPS आणि डॉक्टर झालेल्या महिलांबद्दल मुस्लिम नेते बदरूद्दीन अजमल यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. मुस्लिम समाजातील IAS-IPS आणि डॉक्टर झालेल्या महिलांनी हिजाब घातला पाहिजे. मुस्लिम महिलांना हिजाब घालणं किंवा स्वत:चे केस झाकता येत नसतील, तर त्या मुस्लिम आहेत. हे कसं समजेल? असं बदरूद्दीन अजमल म्हणाले.

AIUDF चीफ बदरुद्दीन अजमल म्हणाले की, बाहेरच्या भागात मी बघितलय, मुली जेव्हा शिक्षणासाठी जातात, तेव्हा त्यांच्या डोक्यावर हिजाब असतो. त्यांच डोकं खाली आणि डोळे खाली असतात. पण तेच आसामबद्दल बोलायच झाल्यास मुलींनी हिजाबमध्ये राहण आवश्यक आहे. डोक्यावरचे केस लपवण, हिजाब घालण हे आपल्या धर्मात आहे.

हेही वाचा    –    अयोध्या श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळा निमित्त भोसरी येथे मानवी साखळी 

मुलींचे केस हे सैतानाची रशी आहेत. मुलींचा मेकअप सैतानाची रशी आहे. त्यामुळे बाजारात जाण्याआधी त्यांचा चेहरा झाकलेला हवा, नजर खाली हवी. सायन्स विषय घेऊन शिका, डॉक्टर, IAS, IPS व्हा. तुम्ही या गोष्टी फॉलो केल्या नाहीत, तर मुस्लिम महिला IPS, डॉक्टर आहेत, हे कसं समजणार? असं बदरूद्दीन अजमल म्हणाले.

बदरूद्दीन अजमल यांनी मागच्यावर्षी ऑक्टोंबर महिन्यात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वाक्तव्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला होता. मुस्लिम चोरी, दरोडा, रेप आणि लुटमारी सारख्या गुन्ह्यांमध्ये नंबर एक आहेत. आपण तुरुंगात जाण्यातही नंबर एक आहोत, असं बदरूद्दीन अजमल म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button