breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC : आज सायंकाळी आणि उद्या पाणी पुरवठा विस्कळीत

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणा-या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्राचा विद्युत पुरवठा शुक्रवारी (दि. 13) व शनिवारी (दि. 14) खंडित झाल्यामुळे पाण्याचा उपसा झाला नाही. त्यामुळे आजचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. आज सायंकाळी आणि उद्याचा देखील पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

रावेत येथील बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केले जातो. रावेत येथील अशुद्ध जल उपसा केंद्राचा काल शुक्रवारी आणि आज शनिवारी सकाळी विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे त्या कालावधीत पाण्याचा उपसा झाला नाही.

परिणामी, पिंपरी-चिंचवड शहरातील आज सकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. तसेच आज सायंकाळी आणि  उद्याचाही पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button