breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पवना, मगर बँक निवडणूक अन्‌ पिंपरी-चिंचवडमधील निर्णायक भूमिकेत ‘स्थानिक’च!

दि. ९ एप्रिलला मतदान, दि. १० एप्रिलला लागणार निकाल

पिंपरी ।विशेष प्रतिनिधी
उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य, कष्टकरी नागरिकांची ‘अर्थवाहिनी’ अशी ओळख असलेल्या पवना सहकारी बँक आणि कै. अण्णासाहेब मगर सहकारी बँकेची निवडणूक चुरशीची झाली आहे. बिनविरोध निवडणूक व्हावी, अशी अपेक्षा असताना गावकी-भावकीच्या वादात निवडणुकीचे मैदान गाजणार आहे. यामध्ये बाजी कुणीही मारली, तरी दोन्ही बँकांवर स्थानिक अर्थात गाववाल्या नेत्यांचेच वर्चस्व राहणार हे निश्चित आहे.

शहरात पवना सहकारी बँक ही भूमिपुत्रांची तसेच पाहुण्या-रावळ्यांची बँक म्हणूनही प्रसिद्ध आहे. या बँकेवर माजी आमदार ज्ञानेश्‍वर लांडगे यांचे किंवा त्यांना मानणाऱ्या विचारांचे संचालक मंडळ सर्व काळ सत्ता पदावर राहिलेले आहे.
या बँकेची स्थापना शहराचे भाग्यविधाते दिवंगत अण्णासाहेब मगर यांनी केलेली आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात बँकेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. माजी आमदार ज्ञानेश्‍वर लांडगे हे सर्वांना बरोबर घेऊन जाणारे व सर्व पक्षीयांबरोबर चांगले संबंध असलेले नेतृत्व असल्याने या बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता होती. मात्र, यावर्षी निवडणूक लागली आहे.

ज्ञानेश्वर लांडगे यांच्या नेतृत्वाखाली अण्णासाहेब मगर पॅनेल पवना बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर विलास भोईर यांच्या पुढाकाराने पवना प्रगती पॅनेल मैदानात उतरले आहेत.

कै. अण्णासाहेब मगर बँकेच्या निवडणुकीसाठी नंदकुमार लांडे यांच्या पुढाकाराने प्रगती पॅनेल निवडणूक लढवत आहे. तर विरोधातील विठ्ठल सांडभोर यांच्या नेतृत्वात सहकार पॅनेल निवडणूक लढवीत आहे. बाळासाहेब गव्हाणे यांनी या बँकेची स्थापना केली आहे.

पुणे जिल्ह्यासह अहमदनगर, सोलापूर, सातारा, रायगड व ठाणे येथे कार्यक्षेत्र असलेल्या या बँकेचा भोसरी, चाकण, चिखली, कोरेगाव भीमा, राजगुरूनगर, संगमनेर, आकुर्डी, शिंदेवासुली, दिघी व मांजरी बु॥ असा १० शाखांचा विस्तार झालेला आहे .
तसेच, पवना बँक ही पिंपरी-चिंचवड भागातील जुन्या टॉप नागरी सहकारी बँकांपैकी एक म्हणून लोकप्रिय आहे कारण तिच्या प्रचंड प्रगतीमुळे. सध्या ही पिंपरी-चिंचवडमधील झपाट्याने प्रगती करणाऱ्या सहकारी बँकेपैकी एक आहे. चिंचवड, कासारवाडी, भोसरी, पिंपरी, काळेवाडी, आकुर्डी, वाकड, सोमाटणे फाटा, चिंबळी फाटा, रावेत, आळंदी, दापोडी, वाघोली, पाषाण, देहूगाव, वडगाव मावळ, स्पाईन रोड, कामशेत, शिक्रापूर, मारुंजी, इंदुरी आणि चिखली येथे येथे २२ शाखा आहेत.

या निवडणुकीसाठी दोन्ही पॅनेलकडून अत्यंत जोरादार प्रचार सुरू आहे. १० ते १५ हजाराच्या घरात सभासद संख्या असतानाही शहरातील प्रमुख चौकांत फ्लेक्स आणि जाहिरात ‘ब्रँडिंग’ सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

स्थानिक नेतेच निवडणुकीचे आधारस्तंभ…
पिंपरी-चिंचवडमधील राजकारण गावकी-भावकी आणि नातेसंबंधांवर अधारीत आहे. पवना आणि अण्णासाहेब मगर बँकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा गावकी-भावकीत निवडणूक होणार हे निश्चित झाले. या निवडणुकीत स्थानिक सर्वपक्षीय नेते यांचा जाहिरातींमध्ये ‘आधारस्तंभ’ असा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये भोसरीचे विद्यमान आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील, मावळचे आमदार सुनील शेळके यांचे फोटो आहेत. त्यामुळे ही निवडणूक कोणीही जिंकली, तरी वर्चस्व स्थानिकांचेच राहणार आहे.

आगामी २५ वर्षे स्थानिकच सत्ताधीश…
पिंपरी-चिंचवड शहराची स्थापना होवून आता ५० वर्षे झाली आहेत. या काळात स्थानिक नेत्यांनी नेतृत्व केले. स्थानिकांच्या हाता शहराची धुरा राहिली. आणखी किमान २ पिढ्या स्थानिकच शहराचे ‘कारभारी’ राहतील. शहराच्या राजकारणात स्थानिक आणि बाहेरचा असा अप्रत्यक्ष छुपा संघर्ष आहे. बाहेरुन आलेले नेतृत्व इथल्या स्थानिकांवर वर्चस्व करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, तुर्तास तशी सुतराम शक्यता नाही. यासाठी आणखी किमान २५ वर्षे वाट पाहावी लागेल, असाच संदेश पवना आणि अण्णासाहेब मगर बँकेतील निवडणुकीमुळे मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button