breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

ग्रामपंचायत निवडणुकीत सासरे विरुद्ध सून

जळगाव जिल्ह्यात खडसे विरूद्ध खडसे असा सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपला सोडचिठ्ठी देत एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ मनगटावर बांधलं. मात्र, त्यांचीच सून असलेल्या रक्षा खडसें यांनी भाजपातच राहण्याचा निर्णय घेतला. यामुळेच आता मुक्ताईनगर ग्रामपंचायत निवडणुकीत सासरे विरुद्ध सून अशी परिस्थिती तयार होण्याची शक्यता आहे.

मुक्ताईनगरमध्ये 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत. यामध्ये ग्रामपंचायती जिंकण्याची जबाबदारी भाजपकडून रक्षा खडसेंवर असेल, तर राष्ट्रवादीसह महाविकास आघाडी एकत्र लढली तर ती जबाबदारी एकनाथ खडसेंवरच येणार आहे. त्यामुळेच या निवडणुकीत चुरस वाढली आहे.

एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात होत्या. चंद्रकांत पाटलांच्या रुपानं शिवसेनेचा कडवा विरोध एकनाथ खडसेंना होता. मात्र, आता खडसेच राष्ट्रवादीत आल्यानं आणि महाविकास आघाडीची सत्ता राज्यात असल्यानं हा विरोधही कमी झाला आहे. त्यामुळं मुक्ताईनगरमध्ये राजकीय वातावरण कसं रंगतय हे पाहणे औत्सुकतेचे होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button