breaking-newsTOP Newsक्रिडा

कर्णधार संजू सॅमसनची संयमी खेळी; राजस्थानचा कोलकातावर दमदार विजय

मुंबई – आयपीएलच्या मैदानावर काल रंगलेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात राजस्थानने कोलकातावर 6 विकेट्सने दमदार विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 134 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान कोलकाताने 18.5 षटकांत 4 विकेट्स गमावून पूर्ण केले. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने सर्वाधिक नाबाद 42 धावा केल्या. तर यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबेने प्रत्येकी 22 धावांची खेळी केली. तसेच कोलकाताकडून वरुण चक्रवर्थीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. दरम्यान, मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये हा सामना खेळविण्यात आला होता.

सामन्याच्या सुरुवातीला नितीश राणा आणि शुबमन गिलने कोलकाताच्या डावाची सुरुवात केली. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात चोरटी धाव घेताना शुबमन धावबाद झाला. त्याने ११ धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये कोलकाताने १ बाद २५ धावा फलकावर लावल्या. पॉवरप्लेनंतरच्या विश्रांतीनंतर नितीश राणाही माघारी परतला. वेगवान गोलंदाज चेतन साकारियाने त्याला यष्टीपाठी झेलबाद केले. राणाने २२ धावा केल्या. त्यानंतर आलेला सुनील नरिनही काही खास करू शकला नाही. जयदेव उनाडकटने त्याला १०व्या षटकात माघारी धाडले. यशस्वी जयस्वालने त्याचा उत्तम झेल टिपला. नरिनला केवळ ६ धावा करता आल्या. नरिननंतर आलेला कर्णधार ईऑन मॉर्गन पुन्हा अपयशी ठरला. मॉरिसच्या षटकात धाव घेताना तो धावबाद झाला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. मग राहुल त्रिपाठीने ३६ धावांचे योगदान देत संघाची धावगती वाढवली पण १६व्या षटकात मुस्तफिजुरने त्याला बाद केले. १७व्या षटकात कोलकाताने शंभरी ओलांडली. त्याचवेळी मागील सामन्यात तुफान खेळी करणाऱ्या आंद्रे रसेलला ख्रिस मॉरिसने बाद केेले. रसेलने केवळ ९ धावा केल्या. याच षटकात दिनेश कार्तिकही झेलबाद झाला. कार्तिकने २५ धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकात मॉरिसने फक्त ६ धावा देत २ बळी टिपले. तर ४ षटकांमध्ये मॉरिसने २३ धावा देत ४ बळी घेत कोलकाताच्या डावाला सुरूंग लावला.

मग कोलकाताने दिलेले 134 धावांचे आव्हान घेऊन राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलरने सलामी दिली. कोलकाताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने चौथ्या षटकात बटलरला पायचित पकडले. बटलरला ५ धावा करता आल्या. मग सुसाट सुरुवात केलेला यशस्वी जयस्वालही पॉवलप्लेमध्ये बाद झाला. शिवम मावीने त्याला वैयक्तिक २२ धावांवर झेलबाद केले. ५ षटकांत राजस्थानने २ बाद ४१ धावा केल्या. दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर शिवम दुबे आणि कर्णधार संजू सॅमसनने डाव सांभाळला. १० षटकांत राजस्थानने ८० धावांपर्यंत मजल मारली. अर्धशतकी भागीदारीकडे वाटचाल करत असताना चक्रवर्तीने दुबेला माघारी धाडले. दुबेने २२ धावांचे योगदान दिले. त्यानंतर आलेला राहुल तेवतियाही स्वस्तात माघारी परतला. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने त्याला झेलबाद केले. त्यानंतर संजू सॅमसन आणि डेव्हिड मिलरने १९व्या षटकांत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सॅमसनने ४२, तर मिलरने २४ धावांची नाबाद खेळी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button