breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

परमबीर सिंह यांनी होम गार्ड विभागाचा कार्यभार स्वीकारला!

मुंबई । प्रतिनिधी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आज होम गार्ड विभागाचा कार्यभार स्वीकारला. सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटी रुपये वसुलीचे आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास परमबीर सिंह होम गार्ड विभागाच्या कार्यालयात पोहोचले आहेत. राज्य सरकारने मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन त्यांची बदली होम गार्ड विभागात केली आहे.

दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन हटवण्यात आल्यानंतर परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केलेल्या आरोपांमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांबाबत शंका उपस्थित केली असून उचलबांगडी करण्यात आल्यानंतरच आरोप का केले? अशी विचारणा केली आहे. शऱद पवार यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरोंसारख्या पोलीस प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या अधिकाऱ्याकडून ही चौकशी केली जाऊ शकते असं सुचवलं होतं. त्यावर ज्युलिओ रिबेरो यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“परमबीर यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, तसेच अंबानी धमकी प्रकरणाच्या तपासातील गोपनीय माहिती उघड होणे हा मुंबई पोलिसांचा गलथानपणा ठरतो. या सगळ्या आरोप-प्रत्यारोपांमुळे मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेलाही धक्का बसत आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरोंसारख्या पोलीस प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या अधिकाऱ्याकडून ही चौकशी केली जाऊ शकते,” असं शरद पवार रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button