breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PAPAJI THE SHEIF : जैन सोशल ग्रुप डायमंड पिंपरी चिंचवडने आयोजित ‘पापाजी द शेफ’ उत्साहात

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

जैन सोशल ग्रुप डायमंड पिंपरी चिंचवडने आयोजित केला होत. ‘पापाजी द शेफ’ कार्यक्रम. हा कार्यक्रम मास्टर शेफच्या थीमवर आधारित होता. ज्यामध्ये सर्व पुरुष सदस्यांनी वेगवेगळ्या फेरीत खाद्यपदार्थ तयार केले होते.
घरची संपूर्ण जबाबदारी स्त्री ने आणि अर्थार्जन आणि त्यानिमित्त कराव्या लागणार्‍या खटपटी पुरुष वर्ग सांभाळून घेतो अशा मानसिकता असणार्‍या जैन कुटुंबातील पुरुष मंडळींसाठी हि स्पर्धा आव्हानात्मक होती. अध्यक्ष पंकज गुगले, कार्यक्रमाची संपूर्ण धुरा सांभाळणारे कार्यक्रम लीडर श्री व सौं प्रशांतभाई गांधी आणि पवन भाई शाह यांनी किमान 20-22 दिवसा पूर्वी पासून कार्यक्रमाची पूर्वे तयारी करायला सुरुवात केली. सर्व सभासदांनी रजिस्ट्रेशन केल्यावर संपूर्ण ग्रुपला आठ संघामध्ये विभागले. प्रत्येक ग्रुपला एक मेंटोर आणि कॅप्टन नेमण्यात आले. संपूर्ण स्पर्धेसाठी विविध निकष लावण्यात आले होते. उदाहरणार्थ प्रत्येक संघाने थीमला अनुसरून एक नाव, एक शानदार परफॉर्मन्स आणि एक ड्रेस कोड ह्या मूलभूत गोष्टी करणे अपेक्षित होत्या.
आवो कुछ हटके करे, पीक अँड प्रिपर, पसंद अपनी अपनी या तीन राऊंड मध्ये स्पर्धा घेण्यात आली. ‘आवो कुछ हटके करे’ या मध्ये वेलकम ड्रिंक, सलाड, फायरलेस स्टार्टर. पिक अँड प्रिपरमध्ये चिठ्ठी उचलून त्यात लिहालेली कृती करणे अपेक्षित होते. तिसर्‍या राऊंडमध्ये मिस्ट्री बॅग मध्ये असणार्‍या वस्तू मधून किमान 2 व कमाल जास्तीत जास्त वस्तू वेळेमध्ये करणे अपेक्षित होते.
या बरोबर महिलांसाठी शारीरिक कसरत, रेसिपी आणि त्यातील पौष्टिक घटक, जनरल नॉलेज आणि ग्रुप डान्स अशा विविध स्पर्धा आणि त्याचेही गुण स्पर्धामध्ये पकडले जाणार होते. खूप गोष्टीची तयारी सभासदांना करायची होती. पण पुरुष वर्गाने खूप सकारात्मकता दाखवून सराव केला. महिलांनी त्यांना पूर्ण मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या वेळी अत्यंत उत्कृष्ट सादरीकरण, चवदार पदार्थ, सुंदर आणि आकर्षक मांडणी, पोष्टिक्ते वर अभ्यासपूर्ण माहिती, स्वच्छता, नीटनेटके पणा या सर्व गोष्टी अचंबित करणार्‍या होत्या.
सुविख्यात शोभा इंदानी या स्पर्धेसाठी परीक्षक होत्या. इतक्या विविध रेसिपीज पाहून त्या ही थक्क झाल्या. सर्व पुरुष वर्गाची भरभरून स्तुती केली. नावीन्यपूर्ण संकल्पना,उत्तम आयोजन आणि योग्य अंमलबजवणी, सर्व सभासदांचा उत्साही सहभाग, पूर्ण तयारी, हेल्धी स्पर्धा, अंबियन्स हॉटेल सारखं स्थळ, सर्व कार्यकारणी ची उत्तम साथ त्यामुळे हा कार्यक्रम लक्षणीय आणि आनंद दायी ठरला. या कार्यक्रमाला पुणे परिवार चे अध्यक्ष श्री चोरबोले जातीने उपस्थित होते. डायमंड ग्रुप चे त्यांनी विशेष कौतुक आणि अभिनंदन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button