breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

पंकजा मुंडे यांना BRS पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याची चर्चा सातत्याने होत आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांना तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे. पंकजा मुंडे बीआरएसमध्ये आल्यास त्यांना मुख्यमंत्री पद देऊ असं चंद्रशेखर राव यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण अलं आहे.

पंकजा मुंडे बीआरएस पक्षात आल्या तर आम्ही त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री करू. त्याचबरोबर बीड पासून हैद्राबादपर्यंत रेड कार्पेट अंथरून आम्ही पंकजा मुंडे यांचे स्वागत करू अशी ऑफर बीआरएस पक्षाचे महाराष्ट्राचे समन्वयक शिवराज बांगर यांनी दिली आहे.

हेही वाचा – ‘२०२४ पर्यंत देशातील रस्ते अमेरिकेपेक्षा चांगले करणार’; नितीन गडकरींचा दावा

पंकजा मुंडे यांचा आवाज भाजपकडून दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या टीमकडून हा प्रयत्न केला जात आहे. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचं मोलाचं कार्य भाजपसाठी आहे. मात्र आज त्यांच्याच मुलींना या ठिकाणी डावलण्यात येत आहे. त्यांचा आवाज दाबला जात आहे. आज महाराष्ट्राचं नेतृत्व या पंकजा मुंडे आहेत. ४५ ते ५० विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे या सांगेल तोच आमदार होतो. मात्र हे सगळं असताना या नेतृत्वाला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं शिवराज बांगर म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button