breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

पाकिस्तानच्या तालिबान प्रेमामुळे सार्कची महत्त्वाची बैठक रद्द

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या  तालिबान  प्रेमामुळे सार्क  देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक रद्द झाली आहे. सार्क समूहातील परराष्ट्र मंत्र्यांच्या आगामी बैठकीत तालिबानच्या प्रतिनिधीला स्थान देण्याचा आग्रह पाकिस्तानने धरला होता. त्याच कारणास्तव ही बैठक रद्द झाली आहे. मागच्यावर्षी २०२० मध्ये कोरोना काळात सार्क देशांची व्हर्च्युअल बैठक झाली होती. न्यू यॉर्कमध्ये होणाऱ्या ७६ व्या संयुक्त राष्ट्र आमसभेच्या पार्श्वभूमीवर सार्क देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची येत्या २५ सप्टेंबरला अनौपचारिक बैठक होणार होती.

सर्व सदस्य देशांमध्ये एकमत नसल्यामुळे बैठक रद्द करण्यात येत असल्याचे नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकाद्वारे कळवले आहे. परराष्ट्र मंत्र्यांच्या अनौपचारिक बैठकीत तालिबानला अफगाणिस्तानचे प्रतिनिधीत्व करण्याची परवानगी द्यावी, ही पाकिस्तानची मागणी मान्य करण्यास बहुतांश सदस्य देशांनी नकार दिला, असे सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितले.

अश्रफ घानी यांचे सरकार उलथवून तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता हस्तगत केली आहे. या घानी सरकारमधील एकाही सदस्याला कुठल्याही परिस्थितीत सार्कच्या बैठकीत स्थान देऊ नये, अशी पाकिस्तानची मागणी होती. १५ ऑगस्टला तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर नियंत्रण मिळवलं.

तालिबान आपल्या सरकारला जागतिक समुदायाने मान्यता द्यावी, यासाठी प्रयत्न करतोय. त्यांनी हंगामी मंत्रिमंडळही स्थापन केले आहे. पण तालिबानच्या सरकारचा चेहरा सर्वसमावेशक नसल्यामुळे जगातील अनेक प्रमुख देशांचा त्यांना विरोध आहे. फक्त पाकिस्तान आणि चीन हे दोन देश ठामपणे तालिबानच्या मागे उभे राहिल्याचे दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button