TOP Newsक्रिडाताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिवाजी विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन

पिंपरी चिंचवड | आजचे विद्यार्थी हेच उद्याचे संशोधक व देशाचे निर्माते असल्याचे प्रतिपादन देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. कृष्णा दाभोळे यांनी देहूरोड येथे केले.पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री शिवाजी विद्यालयात रविवारी (दि.12) माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मैदानी क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन व शुभेच्छा पत्र व चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

या विज्ञान प्रदर्शन, रांगोळी, पुस्तक व चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन देहूरोड शहर राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. कृष्णा दाभोळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कार्याध्यक्ष गणेश कोळी, युवक अध्यक्ष आषिश बन्सल, युवा नेते किशोर गाथाडे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शंकर स्वामी, शहर महिला आघाडीच्या सरचिटणीस राजश्री राऊत, सुनिता विश्वकर्मा, विजय पवार, योगेश दाभोळे, विद्यालयाचे प्राचार्य रामदास सानप, पर्यवेक्षिका सविता नाणेकर, विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

विद्यालयात रांगेळी स्पर्धा, वत्कृत्त्व स्पर्धा, एकपात्री नाटक, प्रश्न मंजुषा आदी स्पर्धांच आयोजन करण्यात आले होते. या शिवाय सूर्यनमस्कार व सायकलिंग हे उपक्रम ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहेत.

विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोदवून कृषी उपयुत्त, प्लॅस्टीक मुक्ती, घनकचरा व्यवस्थापन व रस्तेवहातूक या बाबत विविध प्रकल्प सादर केले.

यावेळी उद्घाटक दाभोळे यांनी मुलांचे कौतुक करून आजचे विद्यार्थी हेच उद्याचे संशोधक व देशाचे निर्माते असल्याचे सांगितले.

व्यवसाय विभागाने देखील आपले काही प्रकल्प सादर केले होते. याचे निजोयन संजय काळे, वाळू गांगुर्डे, शिवदास नारायणे, शैलेद्र परदेशी, सोनबा कोद्रे यांच्यासह इतर विज्ञान शिक्षकांनी केले होते.

रांगोळी प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी उत्तम कलाकृती काढल्या. याचे नियोजन रेखा साळुंखे, मिनाक्षी नरके, विद्या ठोंबरे, प्रतिभा मोरे यांनी केले.

विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती जोपासली जावी यासाठी विद्यालयाने पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले होते. याचे नियोजन रेखा चव्हाण यांनी केले. या प्रदर्शनात शरद पवार यांच्या जीवनावर लिहिलेली विविध पुस्तकांचे व ग्रंथाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.

या शिवाय विविध संदर्भग्रंथ, शालेय पुस्तके व कादंबऱ्यां देखील प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या, चित्रकला स्पर्धेत व प्रदर्शनात शरद पवार यांच्या जीवनावरील चित्र रेखाटली होती. याचे नियोजन एम.एस.शेलार यांनी केले.

विद्यार्थ्यांसाठी मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा पाचवी ते आठवी व नववी ते 12 वी या दोन गटात घेण्यात आली. याचे आयोजन क्रीड़ा शिक्षक व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य राजेंद्र काळोखे, मनीषा कठाळे, सुखदेव जाधव यांनी केले होते. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button