TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचे विरोधी पक्षनेत्यांकडे गाऱ्हाणे !

पिंपरी : को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज फेडरेशनने शहरातील हाउसिंग सोसायट्यांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांबाबत निवेदन विरोधी पक्षनेते अजित पवार यांना देऊन ते सोडवण्याचे त्यांना विनंती केली आहे, अशी माहिती फेडरेशनचे अध्यक्ष दत्तात्रय देशमुख यांनी दिली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांनी त्यांच्या ओल्या कचऱ्याचे स्वतः विल्हेवाट करणे हे बंधनकारक केले आहे. तशी अंमलबजावणी सुरू झाली असून महानगरपालिकेने काही सोसायट्यांचा ओला कचरा घेणे बंद केले आहे. महानगरपालिकेने विना तयारी अंमलबजावणी सुरू केल्याने त्याचा त्रास हाउसिंग सोसायट्यांना होत आहे.
बिल्डरांनी ग्रहप्रकलपांमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प राबविणे बंधनकारक आहे. त्यांनी ते राबविले नाही तरी महानगरपालिकेने अशा गृह प्रकल्पांना कम्प्लिशन सर्टिफिकेट दिलेले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने फ्लॅट धारकांकडून त्यांची थकीत मालमत्ता कर वसुलीची मोहीम सुरु केली आहे. फेडरेशनने मागणी केली आहे, की फक्त फ्लॅट धारकांकडून थकीत मालमत्ता कर वसुली न करता सर्व थकबाकीदारांकडून थकीत कर वसूल करावा. बहुतांश सोसायट्यांना महापालिकेकडून फक्त 50% पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे त्यांना 30 ते 80 लाख रुपये प्रति वर्ष पाण्याचे टँकरकडून पाणी विकत घेण्यासाठी खर्च करावा लागतो. यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीवर खूप मोठा वाईट परिणाम होतो.
वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वाकड, थेरगाव, पिंपळे निलख व इतर भागात रस्ता रुंदीकरण न झाल्याने वाहतूक कोंडी होत आहे. तसेच काही ठिकाणी रस्त्याची कामे अर्धवट असल्याने देखील वाहतूक कोंडी होत आहे. फेडरेशनने शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची मागणी केली आहे. शहरामध्ये विविध भागात मेट्रो प्रकल्प राबववेत, रिक्षाचालकांनी मीटर प्रमाणे भाडे घ्यावे, आरटीओने कारवाई करावी, सुस्थितीतल्या बसेस रस्त्यांवर धावाव्या, अशी मागणी केली आहे.
हाऊसिंग सोसायटीज फेडरेशनचे चेअरमन हर्षद देशमुख म्हणाले की, “विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आश्वासन दिले की ते आमचे प्रश्न सोडवण्यासंबंधी प्रयत्न करतील. यासाठी ते महानगरपालिका आयुक्त, मनपा अधिकारी व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सोबत बैठक घेतील.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button