breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

Oppo F19 Pro 5G आणि OPPO F19 Pro+ लवकरच भारतात लॉन्च होणार, काय असणार स्पेसिफिकेशन्स?

चिनी स्मार्टफोन कंपनी OPPO लवकरच भारतात ‘F’ सीरिज लॉन्च करणार आहे. त्याअंतर्गत कंपनी दोन स्मार्टफोन लॉन्च करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, 8 मार्च रोजी OPPO F19 Pro 5G आणि OPPO F19 Pro+ लॉन्च केले जाऊ शकतात. हे दोन्ही फोन अॅमेझॉन  आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध असतील. फोटोग्राफीच्या बाबतीत हे फोन उत्कृष्ट असल्याचं सांगितलं जात आहे.
OPPO F19 Pro वैशिष्ट्य काय असू शकतात?
OPPO F19 Pro मध्ये 6.4 इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. फोन MediaTek Helio P95 SoC प्रोसेसरसह सुसज्ज आहे. यात 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज दिला जाऊ शकतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सल सेकंडरी आणि 2 मेगापिक्सल सेंसर दिला जाऊ शकतो. याशिवाय यात 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असू शकतो.

Oppo F19 Pro+ 5G चे संभाव्य वैशिष्ट्य
Oppo F19 Pro+ 5G मध्ये 6.4 इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. फोन MediaTek Dimensity 800U SoC प्रोसेसरसह सुसज्ज आहे. यामध्ये 64 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड सेन्सर, 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर दिला जाऊ शकतो. सेल्फीसाठी फोनमध्ये 32 एमपी कॅमेरा असण्याची शक्यता आहे. पावरसाठी, OPPO च्या या फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी असण्याची शक्यता आहे.

किंमत किती असणार?
Oppo F19 Pro+ 5G स्मार्टफोन AI हायलाइट पोर्ट्रेट व्हिडिओसह लॉन्च केला जाईल. ज्यामध्ये फेस डिटेक्ट करुन पोर्ट्रेट व्हिडीओ लाईटनिंग होईल. म्हणजेच कमी प्रकाश असला तरी व्हिडिओ चांगला येईल. हा फोन 8 अँटेना आणि नवीन 360 डिग्री रॅप-अराऊंड डिझाइनसह येईल. Oppo F19 Pro+ 5G ची किंमत 25000 रुपये असू शकते. तर Oppo F19 Pro+ ची किंमत 20000 रुपये असू शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button