breaking-newsपिंपरी / चिंचवड

केवळ शरद पवारांची सभाच नव्हे, तर ‘सावरकरांवरील भाषणेही पावसात भिजत होतात’; शरद पोंक्षे यांनी उडवली राष्ट्रवादीची खिल्ली

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

फक्त इलेक्शनच्या सभा पावसात भिजत होत नाहीत, तर सावरकरांवरील भाषणेही पावसात भिजत होतात, अशी टिका अभिनेते व सावरकर अभ्यासक शरद पोंक्षे यांनी बुधवारी (दि. २५) निगडी प्राधिकरण येथे केली. केवळ शत्रूचा शत्रू म्हणून मित्र होतात ती मैत्री कधीच टिकत नाही. ती मैत्री तत्कालिक असते. समान धागे असतील तरच मैत्री टिकते, अशा शब्दांत पोंक्षे यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या सरकारविषयी आपले मत मांडले.

सावरकरांचे विचार आचरणात आणले नाहीत म्हणूनच आज देशाची ही अवस्था झाली आहे. लोकशाही राष्ट्रामध्ये एका विशिष्ट मर्यादेपर्यंत अल्पसंख्यांकांना महत्त्व आहे, हे आम्हीही मान्य करतो. पण तेच महत्त्व लक्षात घेऊन राज्यकर्ते शासन करायला लागले तर मात्र त्या देशाचे फक्त वाटोळे होते. ज्या देशातल्या बहुसंख्य माणसांचा अनादर केला जातो ते राष्ट्र कधीही मोठे होऊ शकत नाही, असा उपदेशही पोंक्षे यांनी व्यक्त केला.

भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहर भाजप, सावरकर प्रेमी व अमोल थोरात युथ फाऊंडेशनच्या वतीने निगडी प्राधिकरणमध्ये “सावरकर विचार दर्शन” या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आदी यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक व शहर सरचिटणीस अमोल थोरात यांनी केले. नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी आभार मानले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी असंख्य गैरसमज पसरवले गेले

शरद पोंक्षे म्हणाले की, “स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी राष्ट्रीय हिंदुत्वाचा विचार जोपासला. त्यांनी देशाला संपूर्ण स्वातंत्र्याची जाणीव करून दिली. सावरकर हे विज्ञानवादी दृष्टीकोन ठेवून जगलेले आहेत. सावरकर यांनी जात निर्मूलनासाठी मोठे कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या तोडीचे त्यांचे समाजकार्य होते. आंतरजातीय विवाह ही संकल्पना सावकरांनी रूजवली. जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर सावरकर यांनी त्यांना काही सूचनांचे पत्र पाठविले. देशाची सीमा सुरक्षित करण्यासाठी मजबूत भींत बांधण्याची सूचना केली. परंतु, त्यांनी केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केले गेले. सावरकरांविषयी असंख्य गैरसमज पसरवले गेले. सावरकरांना ब्राह्मण या व्याख्येत अडकवून ठेवले गेले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button