breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

OnePlus 8 च्या किंमतीत मोठी कपात, स्वस्तात खरेदी करा स्मार्टफोन

नवी दिल्ली – वनप्लसने आपला लेटेस्ट फ्लॅगशीप स्मार्टफोन OnePlus 8T या आठवड्यात लाँच केला आहे. वनप्लसचा हा फोन दोन व्हेरियंटमध्ये येतो. नवीन वनप्लस ८टी चा ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ४२ हजार ९९९ रुपये आहे. तर १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ४५ हजार ९९९ रुपये आहे. आता, नवीन हँडसेट लाँच केल्यानंतर कंपनीने वनप्लस ८ च्या किंमतीत कपात केली आहे.

वनप्लस ८ च्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनच्या किंमतीत ३ हजार रुपयांची कपात केली आहे. या फोनसाठी ४४ हजार ९९९ रुपयांऐवजी आता ४१ हजार ९९९ रुपये मोजावे लागणार आहे. तर १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनसाठी ४९ हजार ९९९ रुपयांऐवजी आता ४४ हजार ९९९ रुपये मोजावे लागतील. म्हणेजच या टॉप व्हेरियंटच्या फोनवर ५ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे.

६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ४१ हजार ९९९ रुपयांऐवजी ३९ हजार ९९९ रुपये ठेवली आहे. दरम्यान, हे व्हेरियंट साईटवर उपलब्ध नाही. परंतु, अॅमेझॉन इंडियावरून खरेदी करता येवू शकते.

वनप्लस ८ स्मार्टफोन ग्लेशियल ग्रीन, इंटरस्टेलर ग्लो आणि ऑनिक्स ब्लॅक कलरमध्ये खरेदी करता येवू शकते. वनप्लस ८ शिवाय, युजर्संना वनप्लस बुलेट्स वायरलेस २ वर सुद्धा सूट मिळणार आहे. ५ हजार ९९० रुपयात लाँच करण्यात आलेले वायरलेस बुलेट्स ४ हजार ४९० रुपयांत खरेदी करता येवू शकते. वनप्लस ८ प्रोटेक्ट योर म्यूझिक बंडलला २ हजार ७८९ रुपयांत लाँच करण्यात आले होते. आता हे २ हजार ५१६ रुपयांत खरेदी करता येवू शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button