breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

महाशिवरात्रीनिमित्त पुण्यातील युवकाने बनवले नाण्यांपासून आकर्षक शिवलिंग

२२ हजार ३०१ नाण्यांचा केला वापर

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली नोंद

पुणे : पुण्यातील काळेपडळ येथील दीपक घोलप या तरूणाने वेगवेगळ्या किंमतीची नाणी वापरुन आकर्षक शिवलिंग बनविले आहे. २२ हजार ३०१ नाण्यांचा त्यासाठी वापर केला असून गेल्यावर्षी या शिवलिंगाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

जगातीलही अशा प्रकारचे हे पहिलेच शिवलिंग असल्याचा दावा या तरूणाने केला आहे. दीपक हा शिवभक्त आहे. तो दररोज नित्यनेमाने शिवमंदिरात दर्शनासाठी जात असतो. शिवलिंग प्रतिमा त्याला कायम मोहीत करते. आपण त्यामध्ये काहीतरी वेगळं करावे, या विचारातून त्याला नाण्यांचा वापर करून शिवलिंग बनविण्याची संकल्पना सुचली. त्याने दोन, पाच, दहा रूपयांची नाणी जमवायला सुरूवात केली. चार महिने परिश्रम घेऊन त्याने अखेर एक आकर्षक शिवलिंग आकारास आणले.

एकूण नाणी – २२ हजार ३०१

दोन रूपयांची नाणी – १४ हजार ९१६

पाच रूपयांची नाणी – ४ हजार ८७५

दहा रूपयांची नाणी – २ हजार ५१०

एकूण रूपये – ७९ हजार ३०१

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button