breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

विधानपरिषद निकाल : सेना, भाजप प्रत्येकी २ जागी विजयी, काँग्रेसला धक्का

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या सहापैकी रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, परभणी-हिंगोली, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या पाच जागांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. तर लातूर-बीड-उस्मानाबाद या मतदारसंघाचा निकाल हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने राखून ठेवला आहे. त्यामुळे या जागेची मतमोजणी लांबणीवर पडली आहे. या सर्व मतदारसंघात सोमवारी २१ मे रोजी मतदान झालं.

LIVE UPDATE

नाशिक– राष्ट्रवादी-भाजपला धक्का, शिवसेनेचे नरेंद्र दराडे विजयी, दराडेंना 412 तर राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे यांना 219 मतं

नाशिक – नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दराडे आघाडीवर

परभणी-हिंगोली – शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी (256 मतं), काँग्रेसच्या सुरेश देशमुख यांचा पराभव (221)

चंद्रपूर – भाजपचे रामदास आंबटकर विजयी – आंबटकर यांना 550 मतं, काँग्रेसच्या इंद्रकुमार सराफयांना 462 मतं.

अमरावती –  भाजपाचे प्रविण पोटे विजयी (458  मतं), काँग्रेसच्या अनिल मधोगरिया यांचा पराभव

9.00 AM अमरावती: मतमोजणी सुरु होण्यापूर्वीच भाजपाचे उमेदवारी प्रवीण पोटे यांचे विजयांचे बॅनर लागले.

8.00 AM विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button