breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

नवरात्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी करतात कन्या पूजन; पाहा मुहूर्त..

Navratri 2023 : आज शारदीय नवरात्रीची महानवमी आहे. हा दिवस माता सिद्धिदात्रीला समर्पित आहे. अश्विन शुक्ल नवमी तिथी 22 ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ७.५८ ते २३ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ५.४४ पर्यंत असणार आहे. नवमी तिथी हा शारदीय नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी हवन-यज्ञ करून नवरात्रीचे ९ दिवस पूजा व उपवास केले जातात. काही लोक नवमीच्या दिवशी कन्या पूजाही करतात.

महानवमी कन्या पूजन मुहूर्त : २३ ऑक्टोबर रोजी कन्या पूजनाचा मुहूर्त सकाळी ६.२७ ते ७.५१ पर्यंत असेल. यानंतर सकाळी ९.१६ ते १०.४१ पर्यंत असेल. या दिवशी इतर पूजा मुहूर्त दुपारी १.३० ते २.५५ आणि नंतर २.५५ ते ४.१९ पर्यंत आहेत.

हेही वाचा – इस्त्राईल-हमास युद्धाचे पडसाद पुणे शहरात उमटले, पुणे पोलिसांची कारवाई

आजचा रंग : मोरपंखी रंग

मोरपंखी रंगाचे महत्त्व : नवव्या दिवशी सिद्धीदात्री देवीची पूजा केली जाते. मोरपंखी रंग वाढ आणि सुपिकतेचं प्रतीक आहे. मोरपंखी रंग हा विशेषता आणि व्यक्तिमत्त्व दर्शवतो. हा रंग महागौरी देवीचा खूप आवडीचा असल्याचे म्हटले जाते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button