breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

इंद्रायणीच्या काठावर चक्क कुत्रा वारकऱ्यांसह भजनात रमला, Video व्हायरल..

पिंपरी | सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ तर आश्चर्यचकीत करणारे असतात. सध्या असाच एक कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या काठावरील आहे. या व्हिडीओमध्ये कुत्रा वारकऱ्यांसह भजनात रमलेला दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओ आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या काठावरील आहे. व्हिडीओत तुम्हाला पांढरे शुभ्र कपडे परिधान केलेले आणि डोक्यावर टोपी असलेले अनेक वारकरी दिसताहेत. हातातील टाळ वाजवून ते भजन गीत गाताना दिसत आहे. भजनात रमलेले हे वारकरी पाहून तुम्हीही भारावून जाल. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की तितक्यात एक कुत्रा तिथे येतो आणि त्यांचे भजन ऐकून भिरभिर बघतो आणि नंतर सर्व वारकऱ्यांच्या मध्ये जाऊन शांतपणे बसतो.कुत्र्याला भजनात रमलेले पाहून कुणालाही आश्चर्य वाटू शकते. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा    –    चॉकलेट डे का साजरा करतात? या दिवसाचे महत्त्व काय? वाचा सविस्तर.. 

https://www.instagram.com/reel/C2w2MQzxCoA/?igsh=YTFwdGlpZWprZzVt

@paulvata_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, त्या संध्याकाळी इंद्रायणीच्या काठावर सुरू असलेल्या भजनात अचानक एक कुत्रा आला. काय झालं कुणास ठाऊक पण तो भजनातून बाहेर जाण्याऐवजी त्या भजनात रमला. बहुतेक हिच ताकद असेल हरी नामात की त्यात माणसंच काय पण प्राणी सुद्धा रमतात. वेगवेगळी मतं असतील पण तुमचं मत काय? कमेंट करुन नक्की सांगा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button