दहावी आणि बारावीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या फेरपरीक्षेचा निकाल आज
पुणे : दहावी आणि बारावीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या फेरपरीक्षेचा निकाल आज (दि. २) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.
राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी पुरवणी परीक्षा २७ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत, तर बारावीची पुरवणी परीक्षा २१ जुलै ते २४ ऑगस्ट या कालाधीत घेण्यात आली होती. परीक्षेचा निकाल राज्य मंडळाच्या http://www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाहीर केला जाणार आहे.
गुणपडताळणीसाठी तीन ते १२ सप्टेंबर, तर छायांकित प्रतीसाठी तीन ते २२ सप्टेंबर या कालावधीत अर्ज करता येणार असल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.