ताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्र

अरेरे भयानकः सिन्नर-शिर्डी मार्गावर भीषण अपघात, खासगी बस-ट्रकची समोरासमोर धडक, १० प्रवाशांचा मृत्यू

नाशिक : नाशिकमधील पाथरे या भागात सिन्नर-शिर्डी मार्गावर खासगी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात १० प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. यामध्ये काही प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे.

सिन्नर-शिर्डी मार्गावर खासगी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. ही दोन्ही वाहने एकमेकांवर धडकली आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या अपघाताचे स्वरून भीषण असून यात बसमधील अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर अनेक प्रवासी जखमी झालेले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार अपघातील ट्रक शिर्डीहून सिन्नरच्या दिशेने जात होते. तर खासगी बस सिन्नरच्या दिशेन येत होती. पाथरे या गावाजवळ हा अपघात घडला आहे. या अपघातात साधारण ३५ प्रवाशी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. मात्र आता पोलीस आणि बचावपथकाच्या माध्यमातून ही वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button