breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

Budget 2020: देशाच्या विकासाला नवीन उर्जा देणारा अर्थसंकल्प : दानवे

मुंबई | महाईन्यूज

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी मोदी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला. सीतारमन यांनी केलेलं अर्थसंकल्पीय भाषण हे इतिहासातील सर्वात दीर्घ लांबीचं ठरलं आहे. तर सीतारमण यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पानंतर राजकीय प्रतिक्रिया येत असून, केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प देशाच्या विकासाला उर्जा देणारा असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलेली आहे.

दानवे म्हणाले, केंद्र सरकारने देशातील सर्व बाबींचा अभ्यास करुन अर्थतज्ज्ञांनी ज्या-ज्या काही सूचना केल्या होत्या त्यातील बहुतांश सूचनांचे पालन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वीकारल्या आहेत. कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी 16 कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे. यासह अनेक सकारात्मक बाबी अर्थसंकल्पात समाविष्ट असल्याचे दानवे म्हणाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button