breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

पंकजा मुंडेंनी समजावलं चहा आणि राजकारणातलं साम्य

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

मला स्ट्राँग चहा आवडतो. चहा चहा आहे, तो दुधासारखा प्यायचा. जे आपल्या वाट्याला येते, त्याची चव आपल्याप्रमाणे बदलून घ्यायची असते.

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) या नेहमीच त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. दरम्यान भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या चर्चा माध्यमांसमोरून येत आहेत भाजप पक्षात त्यांना डावललं जात असल्याच्याही चर्चा सुरु आहेत. दरम्यान एका वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत याच मुद्यांवरुन पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी स्वतः चहा बनवला. दरम्यान या बबद्दल बोलताना पंकजा मुंडे यांनी चहा आणि राजकारणाचं समीकरणच सांगितलं. पंकजा मुंडे म्हणाल्या, “राजकारण कसं असतं, त्यात सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित मिश्रण असतं. चहात थोडी चहापावडर, साखर, वेलची, थोडं आलं टाकलं पाहिजे. हे मिश्रण परफेक्ट झालं तर चहा परफेक्ट बनतो. एखादा दुसरा पदार्थ बनवणं सोपं आहे, पण चहा बनवणं सोपं नाही. हेच राजकारण आणि चहा यांच्यामधलं साम्य आहे”. असं भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या.

तुमच्या राजकारणात कोणी जास्त चहापावडर टाकून ते कडवट करतंय का? असंही पंकजा मुंडे यांना विचारण्यात आले तेव्हा त्या म्हणाल्या की, मला स्ट्राँग चहा आवडतो. चहा चहा आहे, तो दुधासारखा प्यायचा. जे आपल्या वाट्याला येते, त्याची चव आपल्याप्रमाणे बदलून घ्यायची असते. ताटात काही चांगले पडले नाही, तर मी किरकिर करत नाही. मीठ कमी असेल तर लोणचं तोंडी लावण्यासाठी घेते. तिखट कमी असेल तर चटणी खाते, तसंच जीवनातही काही कमी पडलं तर त्याची चव नीट कशी करायची हे मला माहित आहे. असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भाजप मध्ये त्यांना डावललं जात आहे यावर सूचक वक्तव्यं केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button