breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चिंताजनक! खासदार ओमराजे निंबाळकरांवर हल्ला करणारा आरोपी जेलमधून फरार, पोलिसांकडून शोध सुरु

उस्मानाबाद: शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर हल्ला करणारा आरोपी जेलमधून फरार झाला आहे. अजिंक्य टेकाळे असे या आरोपीचे नाव आहे. तो उस्मानाबादच्या जेलमधून फरार झालेला आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी ओमराजे निंबाळकर यांच्यावर हल्ला झालेला होता.

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर 16 ऑक्टोबर 2019 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे हल्ला झालेला होता. त्यानंतर आरोपी अजिंक्य टेकाळे याला अटक करण्यात आलेली होती. गेल्या 10 महिन्यांपासून तो जेलमध्ये होता. सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे उस्मानाबाद शहरातील तांबरी विभागात तात्पुरते कारगृह उभारण्यात आलेले आहे. त्यात आरोपी अजिंक्य टेकाळे याला ठेवण्यात आलेले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button