TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

दंड चुकवण्यासाठी मोटरसायकलला स्कूटरचा क्रमांक ; दोघांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : वाहतुकीचा नियम मोडल्यानंतर दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करण्यासाठी मोटरसायकलला स्कूटरच्या क्रमांकाची पाटी लावून बेकायदेशीरपणे दुचाकीवरून ठिकठिकाणी फिरणाऱ्या तिघांविरोधात आरे पोलिसानी गुन्हा दाखल केला. आरोपी वापरत असलेल्या बनावट क्रमांकावर चार हजार ४०० रुपये दंड आकारण्यात आल्याचे उघड झाले आहे.

जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर) येथे एका वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने मोटरसायकल चालवणाऱ्या एका व्यक्तीला थांबवले आणि प्रलंबित ई-चालान तपासल्यानंतर मोटरसायकलवरील वाहन क्रमाकाची पाटी एका स्कूटरची असल्याचे लक्षात आले. हा प्रकार लक्षात येताच दुचाकीस्वाराला ताब्यात घेण्यात आले.एमआयडीसी वाहतूक विभागात उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले शिवाजी पाटील (५७) जेव्हीएलआरच्या उत्तरेकडील सीप्झ पुलाजवळ कर्तव्यावर होते. त्यावेळी त्यांना आरोपी विनाहेल्मेट दुचाकी चालवत असल्याचे आढळले. त्यांनी दुचाकी थांबविली आणि दुचाकीस्वाराला दुचाकीची कागदपत्रे सादर करण्याची सूचना केली. दुचाकीस्वाराने आपण मालवणी येथील साबीर शाह (२२) असल्याचे सांगितले. वाहन आपल्या मालकीचे नसल्यामुळे त्याची कागदपत्रे नसल्याचे त्याने सांगितले.

त्यानंतर अधिकाऱ्याने ई-चलान यंत्रावर तपासणी केली असता मोटरसायकलचा क्रमांक बनावट असल्याचे आढळले. त्यावेळी शाह याने दुचाकीचा क्रमांक २२७२ असून शेवटचा क्रमांक पुसला गेल्याचा युक्तीवाद केला. पण पुढील पाटीवर दुसरा क्रमांक आढळला. २२७ क्रमांक अन्य एका स्कूटरचा असल्याचे लक्षात येताच पाटील यांना काळेबेरे असल्याचा संशय आला. त्यावेळी ई-चालानवरील दंडाची रक्कम तपासली असता मोटरसायकच्या क्रमांकावर चार हजार ४०० रुपये दंड थकीत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीने दंड भरण्यास नकार दिल्याने अधिकाऱ्याने वाहन ताब्यात घेतले. आरोपी मोटरसायकलसाठी स्कूटरचा क्रमांक वापरत होता. संबंधित स्कूटर मालकाला तीन ई-चालान मिळाले असून त्यात सिग्नल तोडल्याप्रकरणी दंड आकारण्यात आला होता. स्कूटरच्या मालकाने ई-चालानवरील छायाचित्र न तपासता दंड भरला. पण काही महिन्यांपूर्वी जेव्हा त्यांना आणखी दोन ई-चालान मिळाली, तेव्हा स्कूटरच्या मालकाने वाहतूक पोलिसांकडे तक्रार केली.

शाह आणि मोटरसायकलचा मालक झुल्फिकार सय्यद दोघेही मालवणी परिसरात वास्तव्यास आहेत. त्याच्याविरोधात भादंव कलम ४२० (फसवणूक), ४६५ (बनावट दस्तावेजाचा वापर करणे) व ३४ (सामाईक गुन्हेगारी कृत्य) आदी विविध कलमांतर्गत आरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button