Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

आता पावसाळ्यात लोकलचा खोळंबा झाल्यास रेल्वेकडून कळणार लाइव्ह माहिती; रेल्वेने लाँच केले ‘हे’ ॲप

मुंबईः पाण्यापावसात रुळांवर पाणी साचल्याने लोकल विलंबाने धावतात यामुळे आपली लोकल नेमकी कुठे पोहोचली? ती किती मिनिटांत स्थनकात येईल? या प्रश्नाची उत्तरे आता तंत्रज्ञानाचा वापर करून देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.लोकलवरील जीपीएस ट्रॅक करत लोकलची अद्यावत माहिती पुरवणारे यात्री मोबाइल अद्यावत अॅपचे लोकार्पण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक ७ वर लोकार्पण कार्यक्रम आज बुधवारी पार पडला.

उपनगरी लोकल गाड्या वेळापत्रक आणि लाइव्ह लोकेशन जाणून घेण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून दोन वर्षांपूर्वी यात्री अॅप विकसित करण्यात आले होते. या अॅपवर फक्त मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे, ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक दिसत होते. लोकल गाड्यांच्या रिअल टाईम ट्रॅकिंग सुविधा सुरु झाली नव्हती.

बुधवारी ही सुविधा यात देण्यात आली. मध्य रेल्वेच्या सर्व लोकल ट्रेनमध्ये जीपीएस डिव्हाइस बसविण्यात आले आहे. मार्च २०२२ मध्ये बेलापूर-खारकोपर विभागात लोकल ट्रेनमधील लावलेल्या जीपीएस डिव्हाइस चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली होती. यात्री अॅपचे प्रात्यक्षिक करून बघणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहेत.

यात्री अॅपचे वैशिष्ट्ये

– लोकल गाड्यांचे रियल टाईम स्टेटस कळणार
– रेल्वे तिकीट, मासिक, त्रैमासिक पास यांचे दरपत्रक.
– स्थानकांवरील सुविधा
– पार्सल सुविधेचा तपशील.
– आपत्कालीन संपर्क क्रमांक.
– रेल्वे स्थानकातील प्रवासी सुविधा.
– मेगाब्लॉकचा तपशील

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button