breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रराजकारण

‘मी भारतात चालकविरहित कार येऊ देणार नाही’; नितीन गडकरींचं ठाम मत

Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ड्रायव्हरलेस गाड्यांबबत मोठं विधान केलं आहे. ड्रायव्हरलेस कारमुळे त्यांच्या नोकऱ्या हिसकावून घेतल्या जाऊ शकतात, यामुळे तब्बल ७० ते ८० लाख लोकांची नोकरी जाऊ शकते. त्यामुळे मी कुठल्याही किमतीत अशा गाड्या भारतात येऊ देणार नाही, असे ठाम मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

नितीन गडकरी म्हणाले, ऑटोमोबाईलमध्ये सहा एअरबॅग्ज समाविष्ट करणे, रस्त्यांवरील खड्ड्यांचे पॅच कमी करणे आणि इलेक्ट्रिक मोटर्स कायद्यांतर्गत दंड वाढवणे, रुग्णवाहिकांच्या प्रवासासाठी अधिक सोय उपलब्ध करून देणे, या गोष्टींवर भर देणे अधिक महत्त्वाचे वाटते. टेस्लाचे भारतात स्वागत होत असले तरी भारतात विक्रीसाठी चीनमध्ये उत्पादन तयार करणे हा पर्याय नाही. आम्ही टेस्ला भारतात येण्याची परवानगी देऊ पण ते चीनमध्ये उत्पादन करून भारतात विकू शकत नाहीत. हे घडणे अशक्य आहे.

हेही वाचा  –  ‘मराठा आरक्षण आणण्यासाठी हे सरकार आशादायी नाही’; पृथ्वीराज चव्हाण यांचा सरकारवर आरोप 

हायड्रोजन हे भविष्यातील महत्त्वाचे इंधन आहे. आम्ही सार्वजनिक पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी सर्वोत्तम तंत्रज्ञान आणण्याच्या दिशेने काम करत आहोत, असं नितीन गडकरी म्हणाले.

देशात वर्षभरात ५ लाखाहून अधिक रस्ते अपघात होत असतात यात १ लाखाहून अधिक मृत्यू होत असतात. या दुर्घटनांचा प्रभाव ३.८ टक्के जीडीपीवर सुद्धा होतो. मुख्य म्हणजे या अपघातात दगावलेल्यांमध्ये ६० टक्के लोक हे तरुण आहेत. या अपघातांची मुख्य चार कारणे रस्ते बांधणी, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, अंमलबजावणी, शिक्षण, ही आहेत. यामध्ये सुधारणा व बदल करण्यावर सरकारतर्फे भर देण्यात येईल, असेही नितीन गडकरी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button