breaking-newsपिंपरी / चिंचवड

न्यू सिटी प्राईड शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती थाटात साजरी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार ह्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, सामाजिक कार्यकर्ते तात्या शिनगारे, तुषार सुर्यवंशी, दिग्विजय पाटील आदी उपस्थित होते. शिक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक पैलूंवर मनोगत व्यक्त केले. तसेच, यावेळी हॅबिटॅट फॉर ह्यूमॅनिटी इंडिया या संस्थेला देणगी जमा करून देणाऱ्या विदयार्थ्यांना उत्तेजनार्थ प्रशस्ति पत्र देऊन सत्कार करण्यात आला. 

प्रज्ञा, शील, करुणा चैतन्य, शूरत्व, स्वाभिमान, संयम, समयसूचकता अशा निपूण गुणांनी शिवरायांचे चारित्र्य स्वच्छ आणि तेजस्वी होते. त्यामुळेच राजांबद्दल शत्रूना व त्यांच्या स्त्रियांना देखील आदर वाटायचा, असे संस्थापक अरुण चाबुकस्वार म्हणाले.

सध्या शेकडो शेतक-यांच्या आत्महत्या होत आहेत. छत्रपतींचे स्वराज्य म्हणजे जगातील पहिले लोकशाही राज्य होय. राजा व त्यांचे मंत्रिमंडळ हे रयतेचे सेवक आहेत. हे जगात प्रथम शिवरायांनी मांडले व अमलात आणले. त्यामुळेच रयतेच्या भाजीच्या देठाला व गवताच्या काडीलाही इजा पोहचविणाऱ्या राज्यसेवकास सजा होत असे. जगातील प्रत्येक प्रश्नांचे उत्तर शिवचरीत्रात सापडते, म्हणून ‘शिवचरित्र’ हे वर्तमानात सर्वासाठीच प्रेरणादायी आहे.

प्रणिता जाधव या विद्यार्थीनीने सूत्रसंचालन केले. तसेच, शिवादेवी तिवारी हिने आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button