breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राज्यात लवकरच निवडणुका लागणार? राज्य निवडणूक आयोगाने दिले संकेत

मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या महाराष्ट्रातील महानगर पालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त लागला आहे. सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये निवडणुका घेण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगानेच यासंदर्भात संकेत दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात एक परिपत्रक काढत मतदार यादीसंदर्भआत महत्वाची सूचना देण्यात आली आहे. यामध्ये राज्या विधानसभेच्या मतदाक याद्या सर्व स्थानिक संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरण्यासंदर्भात उल्लेख करण्यात आला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने नेमकं काय म्हटलं आहे?

दिनांक १ जुलै २०२३ रोजी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार याद्या सप्टेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत होणाऱ्या महानगर पालविका, नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी वापरण्यात येतील असे अधिसूचित करण्यात येत आहे, असं या अधिसूचनेमध्ये राज्य निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.

हेही वाचा – किशोर आवारेंच्या खुनाचा बदला घेण्याचा कट पोलिसांनी उधळला, पाच जणांना अटक

दरम्यान, राज्यात २६ महानगरपालिका, २५ जिल्हा परिषदा आणि २०७ नगरपालिका, पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. यासोबतच ९२ नगरपरिषदांमधल्या ओबीसी राजकीय आरक्षणाचाही मुद्द अद्याप प्रलंबित आहे. याबात सुप्रिम कोर्टात गेल्या काही महिन्यांपासून सुनावणी सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button