breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

नितेश राणे सलग तिसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात हजर; १५ मिनिटं सुरु होती चौकशी; म्हणाले “पहिल्या दिवसापासून…”

मुंबई |

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. नितेश राणेंना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयातही नितेश राणेंना जामीन नाकारण्यात आला. त्यानंतर आता नितेश राणेंनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. आज या याचिकेवर सुनावणी होणार आहे. नितेश राणे यांच्यावतीने मुकूल रोहतगी युक्तिवाद करणार आहेत. त्यामुळे नितेश राणेंना सुप्रीम कोर्टात तरी दिलासा मिळतो का हे पहावं लागेल.

दरम्यान नितेश राणे बुधवारी कणकवली पोलीस ठाण्यात हजर झाले होते. सलग तिसऱ्या दिवशी नितेश राणेंनी कणकवली पोलीस स्थानकात हजेरी लावली. यावेळी १५ मिनिटं नितेश राणेंची चौकशी करण्यात आली. पोलिसांना तपासात लागेल ते सहकार्य करण्याची आपली तयारी असल्याचं नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. “सिंधुदुर्ग आणि कणकवली पोलिसांनी मला नोटीस दिली होती. त्याप्रमाणे २४,२५ आणि २६ तारखेला मी हजर झालो. उद्याही (२७ जानेवारी) हजर होणार आहे. पोलीस तपासात सहकार्य करेन असा पहिल्या दिवसापासून शब्द दिला होता. त्यानुसार पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे आणि त्यांनी दिलेल्या वेळात मी उपस्थित झालो आहे. यापुढेही जिथं सहकार्य लागेल तिथे सहकार्य करण्यासाठी तयार,” असल्याचं नितेश राणे यांनी यावेळी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button