breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

राष्ट्रवादीचे मोशीत ‘वरातीमागून घोडे’ : क्रिस्टल सिटीच्या रस्त्याबाबत अजित पवार ‘मिस गाईड’

काम पूर्णत्वास गेलेल्या रस्त्यासाठी द्यायला लावले ‘आदेश’

पिंपरी : मोशीतील लक्ष्मी चौक ते स्वराज सोसायटी या २४ मीटर रस्त्याचे काम सुरू झालेले असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यामाध्यमातून पुन्हा ‘‘रस्त्याचे काम लवकर करा’’ असे आदेश प्रशासनाला देण्यात आले. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी थेट विरोधी पक्षनेत्यांनाच ‘मिस गाईड’केल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मोशी आणि परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे अंतर्गत रस्त्याची कामे मार्गी लावण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडीची सत्ता असताना राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी रस्त्याच्या कामासाठी आत्मियता दाखवली नाही.
दरम्यान, राज्यात भाजपा- शिवसेना महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शहरातील विकासकामांना पुन्हा गती मिळाली आहे. लक्ष्मी चौक ते स्वराज सोसायटी या १२ मीटर रस्त्याचे काम भूसंपादनाचा मोबदला आणि मार्कींगसाठी रखडले होते, ही बाब लक्षात आल्यानंतर भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी तातडीने महापालिका प्रशासनाला आदेश दिले. अवघ्या २४ तासांत रस्त्याचे काम सुरूही झाले. तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी काहीप्रमाणात काम बाकी आहे. तेही काम मार्गी लावण्यात येणार आहे.
भाजपाच्या माध्यमातून सुरू केलेल्या रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना संबंधित रस्त्याचे काम करण्यासाठी नव्याने आदेश देण्याची मागणी केली. याद्वारे एकप्रकारे अजित पवारांना ‘मिसगाईड’करण्यात आले. वास्तविक, श्रेय घेणारे माजी नगरसेवक हे भाजपाच्या तिकीटावर निवडून आले. त्यांना पाच वर्षांत रस्त्याचे काम करता आले नाही, अशी टीका भाजपाचे युवा नेते निलेश बोराटे यांनी केलरी आहे.
अजितदादांनी अधिकाऱ्यांना फोन केलाच नाही…
२०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार होते. दि. १३ मार्च २०२२ रोजी महापालिकेत प्रशासक राजवट सुरू झाली. ‘‘अजितदादा बोले आणि प्रशासक हाले..’’अशी स्थिती होती, तरीही संबंधितांना रस्त्याचे काम करता आले नाही. मात्र, आमदार लांडगे यांनी एका दिवसात रस्त्याचे काम मार्गी लावले. त्यानंतर आठ दिवसांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना शहाणपण सूचले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रस्त्याच्या कामाबाबत अधिकाऱ्यांना फोन केला, असे सांगितले जाते. याबाबत माहिती घेतली असता एकाही अधिकाऱ्यांने या वृत्ताला दुजोरा दिला नाही. मात्र, रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी सोशल मीडियावर प्रसिद्धी करण्यात आली. केवळ राजकीय श्रेयासाठी नेत्यांची दिशाभूल केली जात असून, राजकारणाचा दर्जा घसरला आहे, अशी टीका भाजपाचे युवा नेते निलेश बोराटे यांनी केली आहे.
विरोधकांना आठ दिवसांनी जाग आली का? : माजी महापौर राहुल जाधव
क्रिस्टल सोसायटी येथे ऐश्वर्यम हमारा, स्वराज रेसिडेन्सी, रिव्हर रेसिडेन्सी, रामकृष्ण हरी सोसायटी आदी सर्व सोसायटीधारकांची दि. २९ जुलै रोजी बैठक झाली. त्याच दिवशी दोन तासांत महापालिका आयुक्त राजेश पाटील आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार महेश लांडगे यांनी आदेश दिले. स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेवून दोन तासांत रस्त्याचे कामही सुरू झाले. दिवस-रात्र काम सुरू ठेवून रस्ता सुस्थितीत करण्यात आला. मात्र, चालू कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाना प्रयत्न विरोधकांनी केला. वास्तविक, स्थानिक नागरिक संबंधित ‘स्टंटबाज’लोकांच्या मागे होती. रस्त्याचे काम करा… अशी विनवनी करीत होते. मात्र, अडीच वर्षे महाविकास आघाडीची सत्ता असताना संबंधितांना रस्त्याचे काम करता आले नाही. राज्याचे विरोधी पक्षनेते आणि स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही आमदार लांडगे यांच्या कामाचे श्रेय घ्यावे लागते, ही विरोधकांसाठी हास्यास्पद बाब आहे, असा घणाघात माजी महापौर राहुल जाधव यांनी केला आहे.
राष्ट्रवादीकडून श्रेयासाठी स्टंटबाजी : माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे
या रस्त्यामुळे परिसरातील विविध सोसायट्यांमधील सहा हजार सदनिकाधारकांना फायदा होणार आहे. त्यामुळे हा रस्ता महत्त्वपूर्ण असून तातडीने त्याचे काम पूर्ण व्हावे अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी यापूर्वीच महापालिका प्रशासनाला दिली. आम्ही स्वत: उभे राहून रस्त्याचे काम मार्गी लावले आहे. स्ट्रॉम वॉटरलाईन, ड्रेनेज, विद्युतवाहिन्यांचे काम एकाच वेळी होणार असून, स्थानिक नागरिकांना दिलासा मिळणार आहे. परंतु, सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडून ‘स्टंटबाजी’केली जात आहे. ही बाब सर्वसामान्य नागरिकांच्या लक्षात आली असून, निवडणुकीत मतदार त्यांना जागा दाखवतील, अशी टीका माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांनी केली आहे.
चालू झालेले काम बंद पाडण्यासाठी कटकारस्थाने : निखिल बोऱ्हाडे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गेल्या अडीच वर्षांपासून महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्तेत होती. मात्र, या रस्त्याच्या कामासाठी त्यांनी स्थानिक नेत्यांनी पाठपुरावा केला नाही. आता भाजपाच्या माध्यमातून रस्त्याचे काम सुरू झाले. स्वत:चे राजकीय अपयश झाकण्यासाठी राष्ट्रवादीकडून श्रेयवाद सुरू केला आहे. मात्र, परिसरातील स्थानिक नागरिक, जागा मालक यांना रस्त्याचे काम कोणी आणि कधी सुरू केले. चिखली-मोशी- पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, स्थानिक सोसायटींचे चेअरमन, पदाधिकारी आणि आमदार महेश लांडगे यांची बैठक दि. २९ जुलै रोजी दुपारी ३ वाजता झाली. आम्ही सर्व उपस्थित होतो. रात्रभर सकाळी पहाटे ५ वाजेपर्यंत रस्त्याचे काम सुरू होते. यावेळेत राष्ट्रवादीचा एकही नेता किंवा इच्छुक उमेदवार त्याठिकाणी फिरकलासुद्धा नाही. याउलट, सुरू झालेल्या रस्त्याचे काम बंद पाडण्यासाठी काहीजणांनी कटकारस्थाने सुरू केली. ही बाब मोशी आणि परिसराच्या हिताची नाही, अशी टीका भाजपाचे युवा नेते निखिल बोऱ्हाडे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button