breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पीएमआरडीएवर श्रावण हर्डीकर यांच्या नियुक्तीची चर्चा

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पीएमआरडीएचे अध्यक्ष किरण गित्ते हे पाच वर्षांसाठी महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर आले होते. त्याचा कालखंड पूर्ण होत आल्याने त्यावर पिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, या वृत्ताचे हर्डीकर यांनी खंडण केले आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना झाल्यानंतर पहिले आयुक्त होण्याचा मान महेश झगडे यांना मिळाला होता. त्यानंतर त्यांची बदली झाल्याने महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी सलगी असणाऱ्या किरण गित्ते यांची नियुक्ती झाली होती.

गित्ते हे त्रिपुरा केडरचे अधिकारी असून महाराष्ट्र केडरमध्ये २०१४ ला प्रतिनियुक्तीवर आले होते. पाच वर्षांचा कालखंड  पूर्ण होत असल्याने गित्ते पुन्हा त्रिपुरा केडरमध्ये जाणार असल्याचे बोलले जात आहे. गित्ते यांनी पीएमआरडीएचे अध्यक्षपद स्विकारल्यानंतर पीएमआरडीएचा एकात्मिक आराखडा तयार केला. हिंजवडी पुणे मेट्रोची पायाभरणीही त्यांच्याच कालखंडात झाली आणि विकसित नगरांची रचना आदी रचनात्मक कामे करून कमी वेळेत त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटला होता.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत नागपूरहून श्रावण हर्डीकर हे मार्च २०१७ मध्ये दाखल झाले होते. हर्डीकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या मर्जीतील आहे, अशी टीका त्यांच्यावर होत असते. हर्डीकर यांनी प्रशासकीय शिस्त लावण्याबरोबरच फ्लेक्स, जाहिरात, पार्किंग अशी विविध धोरणे आणि रचनात्मक विकासाला त्यांनी प्राधान्य दिले. एका वर्षांत सुमारे चार हजार कोटींची विकासकामे सुरू केली. स्मार्ट सिटीलाही गती देण्याचे काम केले. मात्र, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांऐवजी आयुक्तांना टीकेचे लक्ष्य केले आहे. त्यामुळे कार्यक्षम राहूनही टीका होत असल्याने हर्डीकर अस्वस्थ आहेत. त्यामुळे पीएमआरडीएच्या रिक्त पदासाठी त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. याबाबतच्या चचेर्ला उधान आले आहे. महापालिकेचे आयुक्तपद ठेऊन पीएमआरडीएचा पदभार देणार की महापालिकेतून पीएमआरडीएत बदली होणार? याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. दरम्यान पीएमआडीएवर नियुक्तीच्या वृत्तांचे हर्डीकर यांनी खंडन केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button