ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रलेख

नवरात्रौत्सव 2023ः नवरात्रीच्या पाचव्या दिवशी केली जाते स्कंदमातेची पूजा, जाणून घ्या पूजा विधी, मंत्र आणि व्रत कथा

पुणेः नवरात्रीचा पाचवा दिवस स्कंदमातेला समर्पित असतो. या दिवशी स्कंदमातेची विधीवत पूजा, अर्चना केली जाते. स्कंदमाता हे देवी पार्वतीचे दुसरे रूप मानले जाते. तिच्या मुलाचे नाव स्कंदकुमार असल्याने तिचे नाव स्कंदमाता पडले. शास्त्रानुसार स्कंदमाता नकारात्मक शक्तींचा नाश करून जीवनात सुख-समृद्धी आणते. त्यामुळे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेच्या पूजा विधी, मंत्री आणि व्रत कथा.

स्कंदमातेची पूजा विधी आणि मंत्र
सर्व प्रथम ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावे. त्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून स्कंदमातेच्या मूर्तीसमोर किंवा प्रतिमेसमोर बसावे. देवीला पिवळी फुले व हार अर्पण करून पिवळ्या वस्तू अर्पण करा. देवीच्या मूर्तीसमोर दिवा लावा आणि व्रत कथा वाचावी. यानंतर मंत्रोच्चार करून देवीची आरती करावी.

मंत्र :
या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम।।
सिंहासनगता नित्यं पद्माश्रितकरद्वया।शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी।।

स्कंदमातेची आरती
जय तेरी हो स्कंद माता,
पांचवा नाम तुम्हारा आता।
सब के मन की जानन हारी,
जग जननी सब की महतारी।
तेरी ज्योत जलाता रहूं मैं,
हरदम तुम्हे ध्याता रहूं मैं।
कई नामो से तुझे पुकारा,
मुझे एक है तेरा सहारा।
कहीं पहाड़ों पर है डेरा,
कई शहरों में तेरा बसेरा।
हर मंदिर में तेरे नजारे गुण गाये,
तेरे भगत प्यारे भगति।
अपनी मुझे दिला दो शक्ति,
मेरी बिगड़ी बना दो।
इन्दर आदी देवता मिल सारे,
करे पुकार तुम्हारे द्वारे।
दुष्ट दत्य जब चढ़ कर आये,
तुम ही खंडा हाथ उठाये।
दासो को सदा बचाने आई,
चमन की आस पुजाने आई।

जाणून घ्या माता स्कंदमातेची व्रत कथा
धार्मिक मान्यतेनुसार, तारकासुर नावाचा एक असुर होता. त्याने कठोर व्रत करून ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवले की त्याचा अंत महादेवाला जन्मलेल्या पुत्राद्वारेच होईल. तारकासुरला वाटले की महादेवाचे लग्न होणार नाही आणि त्यांना पूत्रही होणार नाही. त्यामुळे तो अमर आहे. तारकासुराने देवलोकात दहशत निर्माण केली तेव्हा सर्व देवतांनी महादेवाला लग्न करण्याची विनंती केली. महादेवाने माता पार्वतीशी विवाह केला आणि स्कंदकुमार नावाच्या पुत्राला जन्म दिला आणि त्याने तारकासुराचा अंत केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button