TOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

नऊवारी नेसून जगभ्रमंती करणाऱ्या चिंचवडच्या रमीला लटपटेला PM मोदींच्या सदिच्छा

म्हणाले,'काही अडचण आल्यास थेट मला फोन कर', मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून ही रमीला-पंतप्रधानांची भेट

पुणे: महिला दिनानिमित्त नऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणाऱ्या चिंचवडच्या रमीला लटपटे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी दिल्लीत भेट घेतली. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून ही भेट झाली. संपूर्ण देश तुझ्यासोबत आहे, काय अडचण आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करत पंतप्रधान मोदी यांनी रमाबाईला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

चिंचवड येथील रहिवासी असलेल्या रमिला लटपटे अहिल्या फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून महिला आणि तरुणांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहेत. आता ‘रमा’ (रायझिंग एबल मॅनकाईंड ऑल राऊंड) या जगभ्रमंती मोहिमेअंतर्गत त्या जगभ्रमंती करत आहेत. मुंबईतील गेट-वे-ऑफ इंडिया येथून त्यांच्या भ्रमंतीच्या प्रवासाचा ९ मार्च रोजी प्रारंभ झाला. त्या ८ मार्च २०२४ ला पुन्हा भारतात परतणार आहे.

रमिला लटपटे नऊवारी नेसून, नथ घालून ४० देशात जगभ्रमंती करत आहे. पुढीलवर्षीच्या ८ मार्च रोजी ती भारतात परत येणार आहे. पिंपरी-चिंचवड येथून सुरु झालेला प्रवास आज १५७२ किलोमीटर मोटरसायकल चालवत दिल्ली मध्ये पोहचला आहे. पंतप्रधान मोदी यांनी तत्काळ वेळ दिली आणि भेट झाली.

संपूर्ण देश तुझ्यासोबत आहे. तुला काहीही अडचण आली. तर माझ्या कार्यालयाशी संपर्क साध, संपूर्ण सहकार्य केले जाईल. व्हिजाची समस्या सोडविली जाईल. माझे आशिर्वाद तुझ्यासोबत आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी स्वीय सहाय्यकाला बोलवून घेत रमाबाईला पूर्णपणे सहकार्य करण्याच्या सूचना केल्या असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले. गुढीपाडव्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांना गुढी भेट दिली. लटपटे यांनी याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

धाडसी प्रवास, धाडसी निर्णय
सामाजित कार्यकर्त्या असलेल्या रमिला यांचा या प्रवासामागचा उद्देश म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृती सोबत राज्यातील सर्व खास वैशिष्ट्ये जगासमोर आणणे होय. रमिला इंडियन कल्चरला प्रमोट करण्यासाठी हा धाडसी प्रवास करणार आहे. या प्रवासात त्या जवळपास १ लाख किलोमीटरचा बाइक्सचा प्रवास करणार आहे. या वर्षभरात ३० हून जास्त देशात जाणार आहेत. या प्रवासाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे रमिला हा संपूर्ण प्रवास साडी नेसून करणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button