breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पुण्यात गॅस सिलिंडर गळतीमुळं आग; दोघे भाजले

पुणे – येथील गुरुवार पेठेतील शितळादेवी चौक परिसरातील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सिलिंडरमधून गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत आई (वय ५५) व मुलगा (वय ३०) जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सूर्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आगीत घरातील अनेक वस्तू जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. जखमींपैकी महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button