ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राज्यपाल भगतसिंह कोषारिंना भेटायला नाना पटोले सायकलवरून राजभवनात पोहचले

मुंबई: इंधनाचे भाव दररोज वाढत असताना त्यातून केंद्रातील भाजपा सरकार जनतेला काहीच दिलासा देत नाही, उलट भारतीय जनता पक्षाचे नेते राज्य सरकारने कर कमी करावेत, असा उफराटा सल्ला देत आहेत. राज्य सरकारचे इंधनावरील कर हे केंद्र सरकारपेक्षा फारच कमी आहेत. केंद्र सरकार कररुपाने आपली तिजोरी भरत आहे. उलट राज्य सरकारच्या हक्कांचा जीएसटी परतावाही केंद्र देत नसतानाही इंधन दरवाढीतून जनतेला दिलासा देण्याची जबाबदारी राज्य सरकारवर ढकलणे ही भाजपाकडून केली जाणारी दिशाभूल आहे.

 

काँग्रेसने नेते आज सायकलवरून राजभवनात पोहोचले असून, इंधन दरवाढ, महागाई, काळे कृषी कायदे, मराठा-ओबीसी आरक्षण मुद्द्यावर राज्यपालांना निवेदन देण्यात आलंय. केंद्रातील भाजपाचे मोदी सरकार इंधन, गॅस, खाद्यतेल डाळींची महागाई करून जनतेला आर्थिक कमजोर करत आहे. कोरोनामुळे लोकांची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली असताना महागाईच्या ओझ्याखाली गोरगरीब, मध्यमवर्ग, नोकरदारही पिचला गेलाय. इंधनावरील कराच्या रूपाने केंद्र सरकार आपली झोळी भरत असून, दररोजच्या महागाईने जनतेचे मात्र कंबरडे मोडलेय. मोदी सरकार मात्र कुंभकर्णासारखे झोपले आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

 

महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस नेत्यांनी आज मलबार हिल येथील हँगिंग गार्डन येथून सायकल रॅलीने राजभवनवर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. इंधन दरवाढ, महागाईबरोबरच, मराठा, ओबीसी आरक्षण आणि कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर काँग्रेस नेत्यांनी राज्यपालांना निवदेन दिले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button