breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले : प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर!

राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी प्रशासनाला दिले आदेश

दि. २३ ऑगस्ट २०२१ पासून प्रभाग रचना कार्यवाही सुरु होणार

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
माहे डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदती संपणाऱ्या नगरपरिषदा/नगरपंचायती व नवनिर्मित नगरपरिषदा/नगरपंचायतींची प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने आदेश जारी केले आहेत. त्यामुळे आता पिंपरी-चिंचवड निवडणुकीचे बिगुल वाजले असून, निवडणूक पुढे ढकलली जाईल, या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ के व २४३ झेड ए अन्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करणे व या निवडणुकांचे अधिक्षण. संचालन व नियंत्रण करणे याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविण्यात आलेली आहे. तसेच, संविधानाच्या अनुच्छेद २४३ आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ४१ (१) नुसार नगरपरिषदांची मुदत संपण्यापूर्वी त्यांची निवडणूक घेणे बंधनकारक आहे.

माहे डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीतील मुदती संपणाऱ्या नगरपरिषदा / नगरपंचायतींची व्यापकता विचारात घेता प्रभाग रचना वेळेवर अंतिम करणे सुकर व्हावे म्हणून प्रारूप प्रभाग रचनेची कार्यवाही सुरु करणे आवश्यक आहे.

३. शासनाने दिनांक १२ मार्च, २०२० रोजी प्रसिध्द केलेल्या महाराष्ट्र नगरपरिषदा/नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अधिनियम, २०२० अन्वये सर्व नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग पध्दती लागू केली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभाग हा एक सदस्याचा असेल. तसेच प्रभाग रचनेसाठी जनगणना कार्यालयाने प्रसिध्द केलेली लोकसंख्येची अलिकडची आकडेवारी म्हणजेच सन २०११ ची लोकसंख्या विचारात घ्यावयाची आहे. त्यानुसार दि. ६/२/२०२० च्या आदेशातील परिच्छेद क्र. ४ नुसार सदस्यसंख्या निश्चित करून तितक्या प्रभागांच्या प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा करण्यात यावा.

नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये श्री. विकास गवळी यांनी महाराष्ट्र शासनाविरुध्द दाखल केलेल्या रिट पिटीशन (सिव्हिल) क्रमांक ९८०/२०१९ मध्ये मा. न्यायालयाने दिनांक ४/३/२०२१ रोजी दिलेल्या निकालानुसार करावयाची कार्यवाही ही आरक्षणासंदर्भात असल्याने प्रारूप प्रभाग प्रसिध्दी व आरक्षण सोडत कार्यक्रमामध्ये त्याबाबतच्या सूचना अलाहिदा देण्यात येतील.

प्रभाग रचनेची तयारी सुरू करणे आवश्यक असल्याने प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याच्या सूचना या पत्राद्वारे देण्यात येत आहे. सोबत जोडलेल्या परिशिष्टातील कार्यवाही करावयाचे टप्यांचे कच्चा आरखडा करताना पालन होईल, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. सोबतच्या परिशिष्टांसह प्रभाग रचनेबाबत्त आयोगाने वेळोवेळी दिलेल्या सूचना, मा. न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग रचना नियमातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे.

६. नगर परिषद / नगर पंचायतीच्या मागील सार्वत्रिक निवडणूकीनंतर अधिसूचनेन्चये हददीत झालेले बदल (क्षेत्र समाविष्ट करणे अथवा वगळणे), विविध विकासकामे योजनांमुळे झालेले भौगोलिक बदल उदा. नवीन रस्ते, पुल, इमारती इत्यादी विचारात घेण्यात यावे, नवनिर्मित नगर परिषदा/नगर पंचायतींनी अधिसूचनेनुसार त्यांचे क्षेत्र निश्चित करून नकाशे तयार करावे.

वरील परिस्थिती लक्षात घेता प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीच्या कार्यवाहीसाठी लागणारा कालावधी विचारात घेता व निवडणुका मुदत समाप्तीपूर्वी पार पाडणे शक्य व्हावे यासाठी सध्या प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात यावा. सदर कच्चा आराखडा तयार करण्याची कार्यवाही ही दिनांक २३ ऑगस्ट, २०२१ पासून सुरू करण्यात यावी. कच्चा आरखडा तयार होताच आयोगाला तात्काळ ई-मेलद्वारे त्वरित अवगत करावे. जेणेकरून पुढील कार्यवाही सुरू करता येईल. आयोगाच्या निदर्शनास आले आहे की, प्रभाग रचना करताना त्याची गोपनियता न राखल्यामुळे व नियमांचे काटेकोर पालन न केल्यामुळे, प्रारूप प्रभाग रचनेविरूद्ध हरकतींची संख्या, अंतिम प्रभाग रचनेंविरूध्द दाखल होणाऱ्या रिट याचिकांची संख्यादेखील वाढते. त्यामुळे अशी अकारण उद्भवणारे न्यायालयीन प्रकरणे आणि या सर्वामुळे होणारा विलंब टाळणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष प्रभाग रचना आरक्षण व सोडतीचा सविस्तर कार्यक्रम यथावकाश राज्य निवडणूक आयोगाकडून निर्गमित करण्यात येईल.

गुगलअर्थ / MRSAC च्या नकाशांवर प्रभागरचनेची मांडणी करण्याची कार्यपध्दती…

१. गुगल अर्थ डाऊनलोड करा.

२. फोल्डर तयार करा.

३. फोल्डरला स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाव द्या

पाच सब फोल्डर तयार करा ज्यांना Placemark, Boundary EB, Barrier आणि Ward अशी नावे द्या.

Placernmark फोल्डर उघडून त्यामध्ये गुगल अर्थ नकाशावर असलेले ग्रामपंचायतीचे स्थान चिन्हांकीत करा.

६. चिन्हांकीत करणेबाबत संपूर्ण माहिती घ्यावीत्यासाठीसोबत जोडलेली विस्तृत माहिती. (pdf) व विडीओ पहावा. विडिओ पाहण्यासाठी https://youtu.be/nfRxH3dRuGk या लिंकवर जावे) सर्वप्रथम ‘Path tool च्या सहाय्याने Barrier फोल्डरमध्ये सर्व नैसर्गिक सीमांचे उदा, रस्ते, 19.

नदी, नाले, अडथळे, इत्यादी रेषा आखून चिन्हांकन करावे. ८. त्यानंतर ‘Polygon toolच्या सहाय्याने स्थानिक स्वराज्य संस्थांची सीमा ही Boundary फोल्डरमध्ये चिन्हांकन करावे.

९. त्यानंतर Polygon tool च्या सहाय्याने EB चेचिन्हांकन करावे.EB फोल्डरमध्ये त्या स्थानिक स्वराज्य संस्थेत असणारे सर्व प्रगणक गटांची सीमा एक एक करून चिन्हांकीत करावी स्थानिक स्वराज्य संस्थेचे संपूर्ण परिक्षेत्राचे प्रगणक गटांमध्ये समावेश होईल याची दक्षता व जिथे घरे नसतील घ्यावीक्षेत्र मोकळे असेलज्यामुळे ते क्षेत्र कोणत्याही प्रगणक गटात येत. आणि हा प्रगणक नसेल त्या क्षेत्रासाठी शून्य लोकसंख्या असलेला प्रगणक गट तयार करावा सर्वात महत्वाचे म्हणजे दोन गट लगतच्या प्रभागात समाविष्ट होईल याची दक्षता घ्यावी माप्रगणक गटामधील सामायिक सी चिन्हांकीत करताना Polygon ची रेषा पूर्णपणे जुळणाया असाव्यात, त्यामध्ये अंतर नसावे.

१०. त्यानंतर ‘Polygon’ tool च्या सहाय्याने Ward फोल्डरमध्ये सर्व प्रभागांच्या सीमांचे चिन्हांकन करावप्रभागांच्या सीमा त्या प्रभागात येणाऱ्या प्रगणक गटांच्या सीमांशी जुळवात तसेच लगतच्या प्रभागाच्या सीमेशी योग्यतऱ्हेने जुळवावेत सर्व EB कोणत्या ना कोणत्या प्रभागात समाविष्ट होईल याची दक्षता घ्यावी.

११. या तयार केलेल्या प्रभाग रचनेची (ML/KMZ फाईलव image फाईल तयार करावी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button