ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

अनधिकृत पत्राशेडवर महापालिका प्रशासनाचा ‘बुलडोझर’!

वाकड, पिंपळे निलखमध्ये धडाका : आठ दिवसांत ३ लाखांहून अधिक चौ.फूट क्षेत्रफळ ‘चकाचक’

पिंपरी: ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्र. २५ व २६ मौजे वाकड व पिंपळे निलख येथील जगताप डेअरी चौक ते भुजबळ चौक, मधुबन हॉटेल रस्त्यांलगत असलेल्या अनधिकृत पत्राशेड तसेच बांधकामांवर ३ जानेवारी ते १० जानेवारी दरम्यान रोज ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयामार्फत निष्कासनाची कारवाई करण्यात आली. सदर कारवाई मध्ये एकूण अंदाजे ३,०२,५८० चौ. फूट. क्षेत्रफळ अनधिकृत पत्राशेड तसेच वीट बांधकामे पाडण्यात आली आहेत.

सदर कारवाई आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ड’ प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त डॉ. अंकुश जाधव यांच्या अधिपत्याखाली करण्यात आली. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे, सुनिल भागवणी उपअभियंता राजेश जगताप, विजय भोजने, कार्यालयीन अधिक्षक अरुणकुमार सोनकुसरे, कनिष्ठ अभियंता वैभव विटकरे, अमोल शिंदे, अमरजीत मस्के, अविनाश चव्हाण, दादा सूर्यवंशी, जय कानडे महानगरपालिकेचे अतिक्रमण पथक, एम. एस. एफ. जवान – २८, महापालिका पोलिस – १६, पोलिस – ६, मजुर – २०, जेसीबी – ४, टेम्पो – १, मनपा कर्मचारी व मजूर यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button