मुंबईतील झोमॅटोच्या पहिल्या ‘महिला रायडिंग सेंटर’चे उद्घाटन
रायडिंग सेंटरद्वारे महिलांना दुचाकी चालवण्याचे प्रशिक्षणही दिले जाणार

मुंबई : अनेकदा घरबसल्या किंवा ऑफिसमध्ये मोबाईल किंवा अॅपवरुन खाद्यपदार्थ मागविण्यासाठी झोमॅटो हे लोकप्रिय ठरले. झोमॅटोद्वारे तुम्हाला तुमचे जेवण अगदी सहज घरपोच मिळते. झोमॅटोने महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एक गुडन्यूज दिली आहे. मुंबई महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगरानी यांच्या हस्ते मुंबईतील झोमॅटोच्या पहिल्या ‘महिला रायडिंग सेंटर’चे उद्घाटन करण्यात आले. या रायडिंग सेंटरद्वारे महिलांना दुचाकी चालवण्याचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. त्यामुळे आता महिलाही झोमॅटोद्वारे जेवण वितरण करताना दिसणार आहेत.
मुंबई महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगरानी यांच्या हस्ते मुंबईतील झोमॅटोच्या पहिल्या ‘महिला रायडिंग सेंटर’चे उद्घाटन पार पडले. या केंद्राचे उद्दिष्ट महिलांची गतिशीलता आणि उपजीविकेच्या संधी वाढ करणे असा आहे. झोमॅटो मुंबई आणि अहमदाबादसह विविध शहरांतील केंद्रांमध्ये हे प्रशिक्षण सुलभ करणार आहे.
हेही वाचा – धनंजय मुंडेंना 30-40 वेळा फाशी देता येईल एवढे पुरावे; मनोज जरांगेंचा दावा
महिलांसाठीच्या उपजीविकेसाठी उपक्रम सुरु
झोमॅटोने सुरु केलेला हा उपक्रम महिलांसाठीच्या उपजीविकेसाठीचा कार्यक्रमाचा भाग आहे. या उपक्रमाचा मूळ उद्देश लिंगभेद दूर करणे आणि लॉजिस्टिक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि संधी देऊन त्यांना सक्षम करणे असा आहे. या झोमॅटो संलग्न कंपन्यांमधील भूमिकांसाठी १०,००० महिलांना प्रशिक्षण देणे हे उद्दिष्ट असणार आहे.
झोमॅटोचे ध्येय काय?
झोमॅटोची स्थापना २०१० मध्ये सुरु झाली. अधिकाधिक लोकांसाठी चांगले अन्न देणे हे झोमॅटोचे ध्येय आहे. झोमॅटो हे असे अॅप आहे, ज्याद्वारे तुम्हाला तुमच्या आवडत्या रेस्टॉरंट मधून घरबसल्या जेवण मागवता येत आहेत आणि झोमॅटो तुम्हाला ते घरपोच आणून देते.