TOP Newsताज्या घडामोडीमुंबई
पश्चिम रेल्वे वाहतूक विस्कळीत, कामावर निघालेल्या मुंबईकरांचा खोळंबा
पश्चिम रेल्वेची वाहतूक २० ते २५ मिनिटे उशाराने सुरू आहे. चर्चगेटच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिणामी सकाळी कामावर निघालेल्या मुंबईकरांचा खोळंबा झाला आहे.
गोरेगाव स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. ओव्हरहेड वायरला काहीतरी बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. जलद लोकल या उशीराने धावत आहेत. लवकरात लवकर तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
तांत्रिक समस्येमुळे सर्व अप आणि डाऊन जलद उपनगरीय लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. झालेल्या गैरसोयीबद्दल खेद आहे. अशी माहिती पश्चिम रेल्वे मुंबई विभाग प्रमुख अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे