जलसंपदा विभागात नोकरीची संधी
मुंबई हे नोकरीची ठिकाण असेल. या नोकरीसाठी उमेदवारांना 1,82,000 रुपये मासिक वेतन मिळणार

मुंबई : जलसंपदा विभागात नोकरीची संधी आहे. ही नोकरीची चांगली संधी आहे. तुमच्याकडे सदर पदाची अर्हता असेल तर घसघशीत पगार मिळेल. या नोकरीसाठी उमेदवारांना 1,82,000 रुपये मासिक वेतन मिळणार आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका. या पदभरतीसाठी शुल्क नसेल. या पदासाठी 17 मार्च 2025 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. मुंबई हे नोकरीची ठिकाण असेल. यासोबतच इतर पदनिहाय जे अनुषंगिक लाभ असतील त्याची पण सोय होईल. त्यामुळे उमेदवारांना या स्पर्धात्मक युगात या पदासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. अभ्यास चांगला असेल तर कदाचित तुम्ही या पदासाठी पात्र उमेदवार ठरू शकता.
विधी सदस्य म्हणून मोठी संधी
तुम्ही एलएलबी, कायदेशीर पदवी प्राप्त केली असेल तर ही संधी तुमच्यासाठीच आहे. या पदासाठी जे निकष आहेत. त्यात तुम्ही बसत असला तर ही संधी सोडू नका. ज्यांच्याकडे पदवीनंतर कायदेशीर प्रक्रियेचा, प्रॅक्टिस आहे. अनुभव गाठीशी आहे, त्यांना विधी सदस्य म्हणून मोठी संधी आहे. विशेष म्हणजे ज्या उमेदवारांचे वय 67 वर्षांपर्यंत आहे, त्यांना सुद्धा या पदासाठी अर्ज करता येईल. अनुभवाच्या जोरावर मात करता येईल. या पदासाठी 1,82,000 रुपये मासिक वेतन देण्यात येईल.
हेही वाचा : इस्लामिक राष्ट्राची पेरणी : काय आहे वक्फ बोर्ड? महाराष्ट्रात कधी झाली वक्फची स्थापना? वाचा!
अर्ज करण्याची पद्धत
उमेदवारांना या पदासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येईल. या पदासाठी व्हॅलेंटाईन डे म्हणजे 14 फेब्रुवारीपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. जर तुम्ही अद्याप अर्ज केला नसेल तर अजून नोकरीसाठी अर्ज करण्याची संधी गेली नाही. तुम्ही आता त्वरीत अर्ज करा. कारण या पदासाठी 17 मार्च 2025 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. या पदासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क द्यावे लागणार नाही, हे विशेष. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे असेल तर उमेदवार [email protected] या ईमेलवर अर्ज पाठवू शकतील.
उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवयाचा असेल तर WRD Vacancy या ठिकाणी देण्यात आलेल्या जाहिरातीत याविषयीचा पत्ता देण्यात आलेला आहे. त्या पत्त्यावर विहित नमुन्यात, संबंधित कागदपत्रे जोडून अर्ज करता येईल. अर्ज करताना चुका टाळणे आवश्यक आहे. घाई गडबडीत अर्ज करू नका. संबंधित जाहिरातीत काय माहिती दिली आहे. त्याची शहानिशा करूनच अर्ज करा.