TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

खरेदी विक्री संकेतस्थळाची गिफ्ट कार्ड देण्याचा संदेश चक्क पोलीस आयुक्तांच्या नावे अधिकाऱ्यांना आला

मुंबई | एका खरेदी विक्री संकेतस्थळाची गिफ्ट कार्ड देण्याचा संदेश चक्क पोलीस आयुक्तांच्या नावे अधिकाऱ्यांना आला. सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीतील भामट्यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या नावाने बनावट व्हाट्सअॅप प्रोफाइल तयार करून तोतयागिरी केली आहे.

आरोपीनी फणसळकर यांच्या संपर्क यादीतील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संदेश पाठवून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.फणसळकर यांचे गणवेशातील छायाचित्र भामट्यांनी व्हॉट्सअॅप प्रोफाईल म्हणून ठेवले. मात्र, कोणीही या फसवणूकीला बळी पडले नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी शुक्रवारी फसवणूक टोळीने तयार केलेला संदेश प्रसारित केला आणि सर्व पोलिस अधिकारी आणि नागरिकांना या फसवणूकीला बळी न पडण्याचे आवाहन केले असल्याचे उपायुक्त(अभियान) संजय लाटकर यांनी सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button